Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Posts Tagged ‘पोस्ट’

एवढ्यात “अहो SSSS ….” अशी हाक तिला ऐकू आली. ऐमिली जरा भानावर आली. कोण एवढ्या जोऱ्यात ओरडत आहे आणि काय म्हणत आहे हे तिला कळे ना. तिनी झटकन रेलिंग ला पकडलं आणि तिचा तोल सावरला. मागे वळून बघते तर तिचं लक्ष पुढे बैचं वर बसल्या एका जोडप्या कडे गेलं. ते काय बोलत होते तिला कळत न्हवत पण तरी तिचं लक्ष त्या बाईच्या कपड्यान कडे गेलं. यांनी मला तर बघितलं नाही, आणि हि बाई मला काही म्हणत आहे का ? असा विचार करत, जवळ असलेल्या एका स्ट्रीट लाईटचा आडोसा घेऊन ती त्यांना बघू लागली. या बाईनी हे काय घातलं आहे या वर ती विचार करत होती.

समोर बैचं वर Mr and Mrs दामले बसले होते. Mr and Mrs का कारण दामले सगळ्यांना अमेरिकेत असाच परिचय द्यायचे. तर या नदीकाठी ते पण city view चा आनंद घेण्यासाठी बसले होते. आणि मिसेस दामले त्यांना काहीतरी म्हणत होत्या. अहो… काढा ती टोपी आता, Englishman ..शोब्तं का तुम्हाला. तुला फारच शोब्तं, दामले म्हणाले. साडी घालून बसली आहे न्यूयॉर्क मधे. अरे I look like people here, you don’t. मधेच दोन तीन इंग्रजी वाक्य टाकून बायकोला चूप करण्याची दामलेंची जूनी सवय. कारण त्यांचा सगळा जन्म पोस्ट मास्तरकीत गेला आणि मिसेस दामलेंचा २ पोर आणि ३ पोरी सांभाळण्यात. मिसेस दामलेना राग आला आणि त्यांनी आपलं तोंड फिरवत दुसरीकडे बघितलं. दामले म्हणाले, अगं मने असं काय करते, हात दे बरं तुझा. असं म्हणत त्यांनी तिचा हात पकडायचा प्रयत्न केला. पण मिसेस दाम्लेना बिलकुल आवडलं न्हवत. त्यांनी हात स्वतः कडे आणखीन खेचला. पुन्हा दामलेंनी जबरदस्तीनी तीचा हात आपल्या हातात घेतला. आणि हातावरच्या रेषा बघत ते बोलले “किती काम करते ग तू या हातांनी “. आता कशला तुम्हाला चिंता, या हत्तांनी तुमचे सकाळेचे पोहे बनवले, पांच पोरांना सांभाळले, तुमच्या आई वडलांच केलं आणि आज तुम्हाला माझ्या हातांची आठवण येते. दाम्लेना कळलं होतं आता बायको भडकली. हे वाक्य मी बोलायला नको होतं , सगळ्या नवऱ्यान प्रमाणे आपण हि चूक नेहमी का करतो, असं म्हणत त्यांनी आपली मान हालवली. असं नाही मने, मी केंव्हा म्हंटल कि तू काही काम केलं नाही. आणि हि होती दुसरी चूक. आता दामले मडमचा पारा आणखीन चढला. हो म्हणा अजून. कि कामं केली नाही, काही तरी चुकलं असेल ना, पोह्यांमध्ये मिरच्या कमी पडल्या वाटतं आज सकाळी, किवां चहा मी आजकाल तसा बनवत नाही जसा २० वर्षांपूर्वी बनवायची ना ? सुधारा आता तरी तुम्ही ७० चे आणि मी ६५ ची झाली आता. मिसेस दामलेंनी हे इतकं भर देऊन म्हंटल कि एमिली सोबतच रस्त्यावर जाणाऱ्या सगळ्यांनी ऐकलं. एका कडे कुत्रा होता तो पण मान वळून मिसेस दामलेन कडे बघायला लागला. एमिलीला हे बघून हसू आले. हि बाई किती जोऱ्यात ओरडली तिच्या ..नवऱ्यावर … पक्का हा नवरा असेल असं स्वतःशी ठरवत ती त्यांच्या कडे पुन्हा बघू लागली.

Mr दामलेंना आता पूर्ण कळलं होतं कि disaster झालं आहे आता recovery mode सुरु करवा लागेल. असं नाही मने …. ते पुन्हा बोलले ….”मग कसं म्हणे ?” दामले मडम ओरडल्या. दामले बोलले शांत हो जरा हे आपलं कोथरूड मधलं डहाणूकर कॉलोनीतला फ्लाट नाही आहे . कि तू आपलं ओरडून प्रत्येक वाक्य मला सांगशील. इथे पोलीस पकडतात बरं असं रस्त्यावर ओरडलं तर. मिसेस दामलेंनी पुन्हा लक्ष दुसरीकडे वळवलं आणि त्या कमी आवाजात बोलल्या . बरं आहे पकडून नेलं तर तुम्हाला. दामले बोलेले काय ? …त्या म्हणाल्या काही नाही ..मने तुझी ही सवय ना कधी जाणार नाही …मला आठवतं जेंव्हा दापोलीला आंब्याचा बागेत झाडावर तुला आंबा खाताना बघितलं होता. तू इतकी गुंग होती त्या हापूस मधे कि आपले कपडे भरले आहे कि नाही काही कळलं नाही तुला. आणि जेंव्हा मी विचारलं तेंव्हा मलाच बोलली …दिसत नाही का ? …आंबा खाते आहे म्हणून ..त्यावरून मला बोलली त्यासाठी मेहनत करावी लागते …आणि तुझा तो आवाज ऐकून त्या बागेतला तो दगडू काका आला ना काठी घेऊन आणि लागला माझ्या माघे … मिसेस दामलेंचा लक्ष अजून दुसरीकडे होते पण चेहऱ्यावर एक हास्य आलं होतं . तरी त्यांनी आपला attitude change केला नाही त्या अजून पण हाताची घडी करून अकडून, तोंड फिरवून बसल्या होत्या . दामलेंनी पुन्हा प्रयत्न केला, मने हाथ दे ना इकडे .. या वेळी मिसेस बोल्या, मी नाही देणार, चला आता घरी …वेळ झाला ..प्रकाश वाट बघत असेल …वाट तर तो कलार्क बघत बसला होता तुझ्या वडलांच्या पत्राची. आणि पत्र मिळालं पण त्याला पण त्यासोबत आणखीन एक निनावी पत्र होतं. आत्ता मात्र मिसेस दामलेंनी Mr दाम्लेंकडे तोंड फिरवलं आणि विचारलं कोणता कलार्क, कोणतं पत्र, तुम्हाला कसं माहित. Mr दामले आता सरळ मन्हाटनकडे बघत होते. त्यांनी आपली नवीन टोपी जरा सरळ केली आणि एक झटक्यात मफलर गळ्याच्या दुसऱ्या भवती गुंडाळलं आणि style मधे उठत बोलले, चाल घरी जाऊ . मिसेस दामलेंनी त्यांना खाली खेचला आणि विचारलं …कोणतं कलार्क ? तो रत्नागिरीचा जो मला बघून गेला होता आणि बाबा त्याची वाट बघत राहिले पण उत्तर आलं नाही. हो तोच , त्याला अजून पण वाटत कि तुला एका कानानी कमी ऐकू येते आणि म्हणूनच तू बोलताना जरा मोठ्यांनी बोलते. अय्य्या ….. कोणी सांगितलं हे खोटं त्याला. सोड ना, आता अग किती वर्ष झाले त्याला आणि तुला येत ना ऐकू बरोबर. नाही.. नाही. सांगा मला, कोण बोललं. दामले हसत तिच्याकडे बघत बोलले. मीच त्याला निनावी पत्र टाकलं होतं. का… तुम्ही असं का केलं. आंब्याचा झाडावर तू आंबा खात होती आणि माझ्या माघे तो दगडू लागला होतां. मी पण विचार केला, दगडू तर माझा पिच्छा सोडेल पण मी तुझा नाही सोडणार 🙂 मिसेस दामलेंच्या चेहऱ्यावर थोडं हसू आलं आणि मग ते लपवत त्यांनी Mr दाम्लेना म्हंटल. काय हो तुम्ही, माझ्या दोन बहिणींच्या लग्नाला पण किती उशीर झाला. सगळे समजत असतील आम्हा पोरीना कमी ऐकू येत म्हणून. हेट ..काही पण, दामले बोलेले. चांगल्या घरी गेल्याना सगळ्या मग. काय तू पण. वरून तो कलार्क अजून पण रत्नागिरीतच आहे आणि तू बघ न्यूयॉर्क मध्ये. आता हात कर पुढे. मिसेस दामलेंनी लाजत हात पुढे केला, आपला नवर्यानी त्या काळी आपल्याशी लग्न करण्यासाठी असं काही केलं होतां हा विचार करून, कितीही लपवून सुद्धा त्यांचं लाजणं चेहऱ्यावरून लपत न्हवत. Mr दामलेंनी एक Mango candy त्यांच्या हातावर ठेवली. हे काय ? दामले बाईनी विचारलं. “This is Mango Candy my dear” …म्हणजे ? मिसेसनी विचारलं. अग आंब्याची गोळी. आच्छा… कुठून आणली ? सकाळी रोहित शाळेत जात होतां ना त्याच्या बैग मधनं चोरली 🙂  काय अहो, तुम्ही नातवाच्या बैग मधनं चोकलेट चोरता ? शोब्तं का तुम्हाला ? अरे चोकलेट चुराया तो कीस के लिये. मेरी जानेमन के लिये. हे ऐकून Mrs दामले खूप जोर्याने हसू लागल्या …

मिसेस दामलेंच हसणं ऐकून ऐमिली भानावर आली. तिला आपण काय करत होतो आणि जेम्स काय करत असेल याची जाणीव झाली. उशीर झाला आहे आणि आपण घरी जायला हवं असं तिला वाटलं. Mr and Mrs दामलेंची भाषा तिला कळली न्हवती पण त्या हाव भाव वरून तिला इतकं काही कळलं होतं कि तिनी घरी वापस जायचा विचार केला. सायकलींग करत जेंव्हा ती घरी आली तर तिला बिल्डिंग बाहेर पाऱ्यानवर जेम्स बसला दिसला. त्याचा हातात बास्केट बाल होता आणि हातावर फिरवत तो आपल्या विचारात गुंग होता. त्याला नकळत ऐमिली त्याचा बाजूला जाऊन बसली. जेम्सनी तिच्याकडे बघितलं आणि तिचा जो हात त्यांनी घट्ट पकाडला होता त्याला स्वतःच्या हातात घेऊन  म्हणाला. ” I am sorry. I shouldn’t have held it so tight.” तिच्या हातावर हात फिरवत एक चोकलेट ठेवत तो तिला बोलला “Could you please forgive me baby” ? ते चोकलेट बघून ऐमिलीचा बांध तुटला . टप टप करत तिचे ते अश्रू त्या चोकलेटवर पडू लागले. रडक्या आवाजात ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत बोलली , “You should not be Sorry, I am sorry James. I will not go there from tomorrow. We will find some other place which is safe to take my classes.” जेम्सनी त्याच्या दुसरा हात तिच्या खांद्यावर ठेवला आणि तिला घट्ट पकडलं. एक वेगळीच शांतता होती, छान वारा वाहात होता. तिसऱ्या माळ्यावरच्या खिडकीतनं ” What a wonderful world…..” असं एक जैझ्झ गाणं ऐकू येत होत. आणि पुढच्या फुटपाथवर एक वयस्क बाई पुन्हा …”these kids” म्हणत आपल्या घरी जात होती ….

————————————————————————————————————-

दोन वेगळ्या जगातील जोडपे एक एकदमचं broad minded, आजच्या काळातलं एकदम खरं अमेरिकन. तर एक एकदमच जुन्या काळातलं, जुन्या परिस्तिथीतलं. पण ते कितीही वेगळे असले तरी खूप काही शिकवून जातात. हेच एमिलीला योग्य वेळी कळलं. लोक बदलतात, काळ बदलतो, परिस्थती बदलते. पण जे बदलत नाही ते म्हणजे प्रेम ……काय वाटत तुम्हाला … ?
– श्रीकांत

Read Full Post »