Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for सप्टेंबर, 2010

कधी कधी वाटतं तुझ्याशी खूप खूप बोलावं,
मनातलं ह्रिदयातलं एकदा सगळं सांगून टाकावं…
पण क्षणातच हे मन त्या ह्रिदयाला सांगतं,
भिंतीवरचा त्या फोटो समोर आपण किती काळ उभं राहावं…

कधी कधी वाटतं तुझ्याशी खूप खूप बोलावं…

कित्येकदा हे मन सांगतं आपल्या आठवणींचे किस्से,
तुला आठवतं का गं… युनिवर्सिटीचा तो रोड आणि ते सायकल रिक्शे
त्या रिक्श्यात बसून तू कॉलेज ला यायची,
आणि माझ्या सायकलीला बघून उगाच नाक मूरडायची…
लेकचरला मात्र मला बघून हसायची,
आणि इथेच माझी खूप गोची व्हायची…

किती प्रयत्न केले नसेल मी तुझ्याशी बोलायचे,
कधी क्लास मध्ये तर कधी लायब्ररीत गाठायचे…
पण तू नेहमी आपली खून्नस द्यायची,
कधी माझ्या सायकलीवर तर कधी माझ्या कपड्यांवर हसायची…

मला आज पण आठवतो तो लायब्ररीतला दिवस,
आत अंधूक प्रकाश आणि बाहेर पावसाचं सावट…
तू ‘इंजिनियरींग ड्राव्हिंगच्या’ सेक्शन जवळ उभी होतीस,
तुझं लक्ष जरी पुस्तकात असलं तरी तुझी सावली माझ्यासोबत बोलत होती
मी म्हंटल “हेल्लो” आणि तू म्हंटल “बावरट”,
मग काय बसलो मी माझ्या मनाच्या काचा आवरत ….

कधी कधी वाटतं तुझ्याशी खूप खूप बोलावं,
मनातलं ह्रिदयातलं एकदा सगळं सांगून टाकावं…..

बाहेर पावसाचे टपोरे थेंब पडत होते,
माझ्या मनाच्या खिडकीत मात्र ते अश्रुंसारखे गळत होते…
मी स्वतःला सावरत कसा बसा बाहेर पडलो,
पण त्या बेधुंद पावसाकडे बघून दारावरच अडलो…

तो पाऊस पण मला आज थांबवू शकत नव्हता,
आपल्या जगण्यात काही अर्थ आहे का, हा प्रश्न मला पडत होता…
कोणता असा गुनाह मी केला होता आज,
फक्त “हेल्लो” तर म्हणालो आणि तीनी ठेवला बावरटाचा ताज
मी इतका पण बावरट नाही हे मला सुधा कळतं,
पण तिच्या मनाला का नेहमी सगळा विपरीतच उमजतं…

नकळतच मी पावसात आता ओला-चिंब झालो होतो,
विचार करता करता जणू कुठे तरी आलो होतो
तेवढ्यात कोणी तरी माझा धरला हात,
समोरचा पाऊल पडण्या आधीच मारली हाक

वळून बघतो तर ती पण पावसात ओली चिंब भिजली होती,
पाऊस जरी थांबला होता तिच्या अश्रूंची सर मात्र पडत होती…
मी खरच करतो गं तुझ्यावर फार प्रेम,
आज माझ्या जवळ काही नसलं तरी फक्त आहे तुझ्याबद्दलच प्रेम
माझ्या हाताला घट्ट पकडून सव्तःला सावरत
ती म्हणली हे आधी का नाही रे तू बोलला… “बावरट”

दाट भरून आलेले ते ढग आता विस्कळीत झाले होते,
माझ्या अंधारमय जीवनात काही सोनरी पावलं आले होते
तिच्या डोळ्यांचे ते अश्रू हातांनी पूसत,
माझे मन त्या प्रेमाने ओले चिंब झाले होते

किती वर्ष झाले गं आज त्या गोष्टीला,
किती पावसाळे मी पहिले प्रत्येक दिव्शीला…
तरी आज पण वाटतं या पावसात बेधडक निघावं,
दूर कुठे तरी जाऊन ओले चिंब व्हावं
माघून येवून तू तो हात पुन्हा धरावं,
आणि कायमचा मला तुझ्यासोबत घेऊन जावं…

कधी कधी वाटतं तुझ्याशी खूप खूप बोलावं,
मनातलं ह्रिदयातलं एकदा सगळं सांगून टाकावं…..

मित्रांनो I know उशीर तर झाला आहे पण still मी संपूर्ण कविता तुमच्या समोर सादर करत आहे. I hope तुम्हला आवडेल.
तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा 🙂

– श्रीकांत

Advertisements

Read Full Post »