Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for फेब्रुवारी, 2010

आजोबा…..

आज सलून मधे seat वर बसलो तर माझं लक्ष माझ्या माघे दुसऱ्या खुर्चीवर असणा-र्या गृहस्थांकडे गेलं . मी माझ्या सोमोरच्या आराशातन त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांनी त्यांच्या समोरच्या आराशातन माझ्याकडे बघितलं आणि smile दिली. Cutting saloon मधे एकमेकान समोर बसवलेले आरशे छान असतात 🙂 कारण त्यांनी तुम्हाला communicate करता येतं. यांना कुठे तरी बघितलं आहे असा विचार मला पडला ….पण कुठे  ?? आणि i guess हाच विचार त्यांना पण पडला असेल .पण त्यांनी smile दिली it means मला ओळखलं असेल ..मग आठवलं, अरे हो.. मागच्या महिन्यात मी आलो होतो तेंव्हा त्यांना  बघितलं होतं.काय योगायोग ना, आज पुन्हा  अशीच भेट झाली. पंधरा सदरा, धोतर आणि गांधी टोपी असं त्यांचं attire बघून मला माझ्या आजोबांची आठवण झाली … त्यांची पण अशीच  style होती. आज  १० वर्ष झाली त्यांना जाऊन पण त्या आठवणी अजूनही फ्रेश आहेत. माझे आजोबा म्हणजे कास्तकार (शेतकरी) पण दूरदुर्ष्टी वाले …त्यांनी जरी त्यांचा जन्म कास्तकारीत घातला पण आपली मुलं ही शिकली पाहिजे याचा पूर्ण प्रयत्न केला .लहानपणी  दिवाळीच्या सुट्ट्यात गावी ज्याचं म्हंटल कि मी खुश व्हायचो. विदर्भातल आमचं गाव, मला पुसटसं आठवत …. पण त्या वेळी बाबा पत्र टाकायचे, कि आम्ही या या तारखेला पोहोचतो आहे  … मग एक गडी, बैलगाडी घेऊन सकाळपासून मेन रोड वर आंब्याचा झाडाखाली आमची वाट बघत बसायचा …आमचं गाव हे highway च्या ८ km आत असल्यामूळे ही कसरत  करावी लागायची, पण मज्जा यायची … ST मधनं उतरल्यावर त्या बैलगाडीत बसून आजूबाजूची शेतं  बघत जायला मज्जा यायची 🙂 गावी पोहचल्यावर केंव्हा शेतात जातो असं व्हायचं ….झाडांना पांढरा कापूस कसा लागतो हे बघून आश्चर्य वाटायचं….पेरू संत्रे direct झाडांवरून तोडून खाण्यात मज्जा यायची …त्या तुरीच्या शेंगा चुलीवर मिठाच्या पाण्यात उकळून खायची माजाच वेगळी होती … 🙂

आमचे आजोबा आम्हा नातवांवर खूप प्रेम करायचे …ते सकाळी शेतात निघाले कि मी त्यांच्या माघे लागायचो …अरे नको खूप ऊन आहे , आपली वाडी खूप दूर आहे तुझे पाय दुखतील असं ते कारण द्यायचे . मग ‘नाही मी येणार’ असा हट्ट धरला कि “ठीक आहे पण पेहले डोक्याला शेला बांध नाही तर ऊन लागेल” असा त्यांचा dialogue असायचा 🙂 पुष्कळवेळा त्यांचा सोबत असा फेर फटका मारला आहे. …अश्या  पुष्कळ आठवणी आहेत …लहानपणी काही मस्ती केली आणि मार खायची वेळ आली कि बाबांपासून तेच वाचवायचे ….आणि कुठे जर मी धडपडलो तर त्या  जखमेवर tincture iodine पण तेच लावायचे  …. ‘यांनी खूप आग होते’ असा म्हंटल कि म्हण्याचे ..अरे पण लवकर ठीक होईल त्यानीच …फार favorite होतं ते त्यांचं dettol पेक्षा पण  🙂 हनुमानाचे ते एक no. भक्त होते … रोज संध्याकाळी गावातल्या  पारावरच्या मंदिरात दिवा लावायला नेमानी जायचे, कीर्तन, काकड आरती यात नेहमी हजार असायचे.

मागच्या आजोबांची cutting संपली आणि ते आपली गांधी टोपी घालून निघाले. हळू हळू काठी घेऊन तोल सांभाळत जातांना त्यांना पाहून वाईट वाटलं, त्यांच्या म्हातारपणाची जाणीव झाली पण त्यांच्या  चेहऱ्यावर smile होती … मी आता चांगला दिसत आहे असे ते expression होते..  ते बघून खूप बरं वाटलं, किती पण काष्ठ झाले तरी या जगाला चेहऱ्यावर समाधान ठेवून आणि smile देऊन तोंड दिलं पाहिजे याची पुन्हा जाणीव  झाली. पुन्हा मला flashback मधे आजोबां सोबतचे शेवटचे दिवस आठवले, ज्या हनुमानाच्या मंदिरात त्यांनी आयुष्भर पूजा केली तिथेच ते पडले 😦 त्या संध्याकाळी गावात वीज नव्हती आणि बहुदा त्यांना अंधारात बरोबर दिसलं नसेल, ३ दिवस ICU मधे राहून चांगले recover होत असताना अचानक एके दिवशी ते गेले. हॉस्पिटल मधे असताना एके संध्याकाळी मी त्यांच्या जवळ बसलो होतो  तेव्न्हा मला म्हणाले “मला मंदिरात जायचं आहे दिवा लावायचा आहे” … मी रागात बोललो ‘ज्या देवानी आज हे केलं तिथे आत्ता दिवा लाऊन काय फायदा’ 😦 तर तीच smile चेहऱ्यावर देत म्हणाले “असं नाही  म्हणायचं ….कळेल तुला एका दिवशी”…आणि खरच आपण किती पोरकट आणि लहान होतो त्या काळी हे आज कळत. स्वतःच्या बालिशपणावर चीढ येते ..पण काळाप्रमाणे माणूस शिकतो ..आज त्यांच्या त्या शब्दांचा अर्थ कळतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवावरचा आणि स्वतःवरचा विश्वास माणसाने कधी सोडू नये.या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत . जुन्या लोकांची हीच गोष्ट मला फार आवडते ते कडक होते पण मनापासून प्रेम करायचे, त्यांचं जग जरी सीमित असलं, लहान असलं पण तरी त्यांच्यात दूर दृष्टी होती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे किती पण कष्ट झाले तरी या जगाला smile देऊन हसून तोंड द्यायचं ही त्यांची शिकवण होती 🙂 I still miss him, there were many beautiful things to learn from him… today he is not there which makes me sad but when I remember his smile that still makes me smile…. cutting संपली, मी smile करत नाव्ह्याला पैसे दिले आणि निघालो ….त्याला पण २ मिंट कळलं नाही कि मला काय झालं !!!  त्यावेळी कुठेतरी मनात मला वाटत होतं कि आजोबा आत्ता पण मला बघून smile करत आहे आणि मी त्यांना reply तर केलाच पाहिजे 🙂

-Shri…

Advertisements

Read Full Post »

किती दिवस ?

शनिवारी संध्याकाळी मी आणि माझा मित्र आम्ही दोघं काही कामं आटपायाला निघालो. त्याला काही शर्ट घ्यायचे होते म्हणून दुकानात शिरलो तोच मुंबईच्या जीजाजींचा फोन आला. hello म्हणायच्या आधीच प्रश्न होता कुठे आहेस ? म्हंटल इथेच घरा जवळ कर्वे रोड ला …. तर ते म्हणाले  घरी पोहचा… बाहेर फिरू नका  कोरेगाव मधे जर्मन बकेरीत ब्लास्ट झाला…!!!! थोडा वेळ काही कळलंच नाही … पुन्हा त्या मुंबई ब्लास्ट चा आठवणी जागृत झाल्या 😦 मुंबईतला तो क्षण पुन्हा आठवला आणि अंगावर काटा आला. पुन्हा त्या क्षणाची पुनरावृत्ती  होते कि काय असा प्रश्न पडला ? घरी ( नागपूरला ) फोन करून आईला सांगितलं कि सगळ ठीक आहे…. घरी पोहोचतो लवकर. काही मित्रांना call केला मग वस्तुस्थिती कळली 😦  वाईट वाटलं , चीड आली आपण किती दिवस असं सहन करणार आणि किती दिवस असं चालणार हा प्रश्न पडला ?

पेपर मधला आकडा सांगतो कि ९ ठार ६० जखमी 😦 आणि त्यातले बहुतांश लोक म्हणजे young crowd 😦 आणि शेवटी यात मरणारा म्हणजे common माणूस हो. बाकीच्यांना काय फरक पडतो  ? फुटणारा बम हा व्यक्तीचा धर्म, जात किवा nationality विचारून थोडी फुटतो ? आणि तसं आजकाल political लोकांनकडनं  काही अपेक्षा नाहीत . अर्धे जण हा picture release नाही झाला पाहिजे यात busy आहेत तर बाकी तो release झाला पाहिजे म्हणून पोलीस बंदोबस्त करतात आहे. अरे काय चालू आहे हे … लहान पोरांना सुद्धा कळतं कुठे वाद घालायचा ? जे झालं ते वाईट झालं पुढे काय होईल याची gurantee नाही 😦 प्रश्न पडतो तर फक्त असं किती दिवस चालणार ?

कधी तरी चार ओळी हिंदीत लिहल्या होत्या ..त्याच पुन्हा सादर करतो आहे ….

बेसब्र क्यूँ हैं आज आदमी … आदमी को बेआबरू करवाने …
क्यूँ उठ खड़ा है वो आज …इस कत्लेआम को अजमाने …
या खुदा इनको कभी जन्नत नसीब न करना,
बहुत कम ही है इनके जैसे आदमी, आदमी को मारने वाले …..

– Shri…

Read Full Post »

जिद्दी

आज सकाळी office साठी निघालो तर बघतो काय हा पठ्ठा माझ्या गाडी वरती मस्त विराजमान. मी म्हंटल पण ‘तू ऑफिस ला येणार ? ‘ आता उगाच timepass करू नको आणि निघ इथनं . पण तो हलायला तयार नाही. ‘अरे बाबा फार थंडी आहे तुझी वाट लागेल’ तरी हलायला तयार नाही. मी म्हंटल ok ….  you are on your own.  मी गाडी सुरु केली मला वाटलं हा उतरेल, पण तरी नाही 😦 आता मी गाडी चा स्पीड वाढवला, रस्त्यावर सोडून माझं लक्ष्य त्याचावरच होतं, आत्ता त्याला थंडी वाजत होती आणि तो कसा बसा त्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत होता. मध्ये वाटलं पण याला आता उतरून देतो पण मग विचार आला …हे संकट यांनी ओढवून घेतला आहे स्वतःवर …let him face 🙂

मी स्पीड आणखीन वाढवला तर, तो आणखीन घट्ट पकडून बसला. Speedometer ६० दाखवत होता आणि mount kilimanjaro वर एखादा mountainer ज्या जिद्दीनी बर्फाच्या वादळात एकाजागी टिकून राहतो तसा हा त्या संकटाला तोंड देत होता. रस्त्यावरचे खड्डे, speed breakers, थंडी हवा सगळ्यांना तो त्याचा परीनी तोंड देत होता 🙂 आत्ता मात्र मला त्याचा हेवा वाटला, तसा मला फार राग येतो त्याचा पण आज त्याच्या पासून शिकण्यासारखा काही तरी होतं. कधी कधी काही लहान गोष्टी कमी वेळात तुम्हाला इतकं काही शिकून जातात ना कि विश्वास बसत नाही 🙂 उपर वालेने जो बनाया है उसका जवाब नाही ….. मी तर म्हणील जर आपण खरच या निसर्गा कडे लक्ष्य देऊन बघितलं तर it’s the best teacher 🙂 खूप काही आहे त्याच्या कढण शिकण्यासारख आणि आपण म्हणतो जगात फक्त माणूस हा सगळ्यात हुशार …. 😦

मी ऑफिस ला पोहचलो पार्किंग मध्ये गाडी लावली आणि त्याला म्हणलो “तू तर साला खूप जिद्दी आहेस without visa, without ticket, without security check ( गेट वर card न दाखवता ) इथे पोहचला … माझ्या घरी पण असाच आला असशील तू … गुड आवडली मला तुझी जिद्द …..माझ्या कडे लक्ष्य न देता त्यांनी spiderman सारखी उडी टाकली ..style मध्ये त्या दोरीला लटकून खाली उतरून निघून गेला … मी म्हंटल बर झालं एका अर्थाने, आधी तू माझ्या घरी जाळे करायचा आता इथे कर 🙂

– Shri… 🙂

Read Full Post »

time = money ?

मित्रांनो माफ करा 😦
हल्ली वेळ मिळत नाही आहे काही चांगलं, झक्कास लिहायला. डोक्यात खूपश्या कल्पना आहेत पण कागदावर उतरवायला वेळ नाही. एके काळी या बाबतीत आम्ही खूप रहीस होतो,  you know na that equation :
time is = money
we have lot of time
hence we have lot of money 🙂 hehehehe 😀 aso

खरतर ब्लोग च हे page  मी कथा, कविता लिहण्यासाठी ठेवलं होतं. पण आजकाल वेळ मिळत नाही आणि हे खाली page पण चांगलं  दिसत नाही.कालच एक  नागपुरी मित्र भेटला आणि म्हणाला “काऊन रे !!!! आजकाल तू लिहित नाही ? ” , किधर गया वो तेरे अंदर का writer ? मी म्हंटल ” साहब बिझी है… आजकाल उनको अंघोळ करने का time भी मुश्कील से मिलता है 🙂  पण खरचं आतनं कसा तरी झालं, स्वतःची चीड आली …. की साला time नाही manage करता येत आपल्याला 😦 कसं होणार 😦  पण मग decide केला कुछ भी हो भिडू कुछ तो लिखनेका 🙂 म्हणून ही पोस्ट लिहली …. I know फालतू  आहे पण it might trigger something…….

– श्री…

Read Full Post »