Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for जुलै, 2009

मला पुन्हा एकदा कॉलेज मधे जायचं….

स्पीडनी गाड़ी चालवत कॉलेज ला पोहचायच़
रोज़ सकाऴी १५ मिनीट उशीरा येऊन लेक्चरमधे शिरायचं
त्याच जून्या रजिस्टर मधे सगऴ्या विषयांचा मजकुर लिहायचा
आणि लेक्चर समपे पर्यंत त्याच पानावर सगऴ संपवायच
मला पुन्हा एकदा कॉलेज मधे जायचं….

तिसरं लेक्चर बंक करुन कैंटीन मधे जायच
वडापाव, समोसे आणि कोल्ड्रिंक प्यायचं
फर्स्ट इयर ते फॉयनल इयरचा सगऴ्या पोरीना नीट बघायच
दुपारी असलेल्या प्रैक्टिकलच संपुर्ण एक्स्परिमेंट दुसर्याच्या प्रैक्टिकल मधनं छापायचं
मला पुन्हा एकदा कॉलेज मधे जायचं….

गण्या, गोप्या, राम्या अशी हाक मारुन सगऴ्याना बोलवायच
आणि कॉलेज सुंदरी असलेल्या ‘अमृता’ कडे लाइब्रेरीत लपून छपून बघायच
तिच्या नवीन असणार्या बॉयफ्रेंड ला नवीन नाव ठेवायचं
आणि ती केव्हां माझ्याकडे बघेल अस समजून तिच्या समोरुन पून्हा पून्हा जायचं
मला पुन्हा एकदा कॉलेज मधे जायचं….

नवीन आलेल्या मॅडमला क्लास संपेपर्यंत रडवायचं
आम्हाला ही नको दुसरी कोणि लेक्चरर द्या अस मह्णुन बोम्बलायचं
चांगल्या मासतरच्या लेक्चरला मात्र गुपचुप बसायचं
आणि क्लास सम्पला की सर ‘important questions for exam ‘ मह्णून ओरडायचं
मला पुन्हा एकदा कॉलेज मधे जायचं….

लास्ट लेक्चर बंक करुन क्ट्यावर जायचं
बंडूच्या चहा बरोबर बनमस्का खायचं
सचिन तेंडुलकर ते जॉर्ज बुश सगऴ्यांबदल बोलायचं
आणि केव्हां अमृता बाहेर पडेल अशी वाट बघायचं
बॉयफ्रेंड सोबत असेल तर चुपचाप घरी जायचं
नसेल तर मात्र मी गाडी चालवीन अस मह्णत पेट्रोल पार्टनरशी भांडायचं

आणि नेहमी प्रमाणे दुस-या दिवशी
रोज़ सकाऴी १५ मिनीट उशीरा येऊन लेक्चरमधे शिरायचं

मला पुन्हा एकदा कॉलेज मधे जायचं….

-श्रीकांत 🙂

—————————————————————-

नमस्कार मंडळी काही दिवसां अगोदर मी ” मला पुन्हा एकदा शाळेत जायचं” ही कविता वाचली आणि मला शाळे बरोबर कॉलेज चे दिवसं आठवले. आणि अवघ्या १५ मिनिटात मी ही कविता लिहून काढली. तशी ही मी माझ्या हिंदी blog वर आधीच post केली आहे. पण i guess तिची खरी जागा इथेच आहे. आशा करतो की आपल्याला पण सव्तः चे कॉलेज चे दिवस आठवतील 🙂

Advertisements

Read Full Post »