Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for जून, 2009

बांद्र्याच्या म्हाडा इमारतीतल्या घर क्रमांक २१६ मधील एक नवी सकाळ. शेजारी रहाणा-या रमणीक सेठचा रेडियो ‘हे राम’ हे भजन वाजवित होता तर खाली रहाणा-या जोशी बाई दूधावाल्या भैयाची झड़ती घेत होत्या. ‘ काय हो भैया … तुम पाणी में दूध मिळवता की दूध में पाणी !!! किती पातळ झाला है दूध… बघितला क्या ‘ :). त्यांच्या वादवादीकड़े दुर्लक्ष करत सुलेखानी कपबशीत चहा गाळला.

१९४० साली श्यामरावांच्या वडीलांनी बनवलेल्या त्या विंटेज अश्या टेबलावर सुलेखानी कपबशी खाडकन आपटली. पेपरमधनं तोंड काढत श्यामराव म्हणाले ‘ अग सुले काय हे… तुटेल न तो टेबल !!!’. “तूटू द्या …. बर होईल नवा तरी येईल घरी. सारा जन्म गेला माझा या घरात जून्या वस्तू सांभाळत तरी नविन गोष्टींचा काही पत्ताच नाहीं. नविन काही म्हंटल तर आमचे हे मूकबधिर होतात ना. तो मेला टीव्ही, काल चक्क तो मिहिर तिस-यंदा प्लास्टिक सर्जरी करूंन आला होता. बघता पण नाही आलं कसा दिसतो म्हणून. या मेल्या टीव्हीला कालच झोपयाच होतं.”

सुलेखाच्या गोष्टींकड़े दुर्लक्ष करत श्यामारावांनी cup हाती धरला. Already अर्धा चहा सुलेखाच्या आदळ-आपटीमुळे बशीत वाहत गेला हे त्यांच्या लक्षात आले. मिचक्या मारत श्यामारावांनी पहिला सिप घेतला. ‘अग सुले काय हे.. कालच नविन चहापत्ती आणली ना मग पून्हा हा गवती चहा का टाकला’. श्या … सगळा रविवार ख़राब केला तू माझा.बाजुच्या टेबलवर अभ्यास करत असलेली पिंकी खदकन हसली. ‘पिंके तुला काय झालं हसायला? गुपचुप इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास कर नाहीं तर आई तुला सोडणार नाही.’ तेवढ्यात सुलेखा किचन मधनं ‘ अहो आजच आपण नवा टीव्ही घेउन येऊ पार्ल्याहून, खालच्या जोशीबाई सांगत होत्या फार स्वस्तात मिळतो म्हणुन’. श्यामराव मनातल्या मानत ‘ त्या जोश्याला काय. Income tax department मधे नोकरी करतो आमच्या सारखे Accounts थोडी लिहतो. उगाच अजुबाजूच्याना बिघडवतो.’

सुलेखा – अहो जायचं ना मग.
श्यामराव – ‘ह्म्म्म बघू ….’.

आता मात्र सुलेखाच डोकं तापतं. कढईत टाकलेला कांदा तसाच सोडून ती झारा घेउन किचन बाहेर येते. ‘ हे बघा आज आपण टीव्ही आणणार and thats full and final ‘. पिंकी हसत ‘ बाबा full and final ? ‘. श्यामराव पेपरात कुठलीतरी बातमी वाचत असतात. ‘ समर्थ नगरातील नागरीकांनी २ ऑक्टोबर हा दिवस रुग्णालयातील रुग्णांना फूल देऊन साजरा केला.’ पिंकी पुन्हा एकदा बाबांना पेनानी टोचत ‘ बाबा सांगाना….full and final का ? श्यामराव ‘ हो एकदम बिलकुल. आपण पण गुलाबाचे फूल वाटायचे होते. हल्ली गांधीजींची कोणाला चिंताच नाही. विसरले सगळे त्याना.’ वाहं…… त्यांचीच फ़क्त आठवण ठेवा, मला मात्र विसरा’ असे म्हणत सुलेखा रागारागात चमचा आपटून किचनमधे निघून जाते.

सुलेखा – आई गं …. अरे रामाSSSS …
श्यामराव – (दबक्या आवाजात) … अग सासुबाई वैष्णोदेवीला गेल्या आहे, अयोध्येला नाहीं. ऐ पिंकी आजी खरचं अयोध्येला गेली का ? 🙂
सुलेखा – हसा खुशाल हसा. जळला ना माझा कांदा. आता तुम्हाला जळके पोहेच खाऊ घालते. बघा..

तेवढ्यात रोहित हरभजन सारखा चेंडू फिरवत घरात दाखल होतो.
रोहित – Hi pops, Whats going on ?
सुलेखा ( किचन मधनं ) – अरे ऐ नालायका. pops च्या lollypop . कुठे गेला होता इतक्या सकाळी भटकायला. रोज सकाळी शाळेत जातांना बोंब. नेहमी उशीरा पोहचतो आणि मार खातो. पण रविवारी मात्र क्रिकेटच्या practice ला सकाळी वेळे आधी हजर. क्रिकेटर बनायाचं आहे न आमच्या सुपुत्राला. आणि इकडे तेंडुलकर च स्पेल्लिंग पण बरोबर येत नाही त्याला…
रोहित – बाबा, आज हवामान काही ठिक दिसत नाही. काय झालं ?
श्यामराव – अरे काही नाही . तेच आपला नेहमीच cyclone 🙂
रोहित – नाव काय आहे ?
श्यामराव – टीवी cyclone 🙂
रोहित – हम्म वाटलच मला. कुठे आहे सध्या? किती नुकसान झालं ?
श्यामराव – सध्या एक चमचा आणि कपबशी तडाख्यात सापडली आहे. कपबशीची खैर नाही पण चमचा वाचेल. वादळ सध्या बंगालच्या खाडीवर आहे पण लवकरच तुझ्या रूमकड़े वळेल. मला अस वाटतं तू निघायला पाहिजे आताचं.

सुलेखा – ( बाथरूम मधन बाहेर पडताना ) रोहित हे काय आहे ?
रोहित – कपडे 🙂
सुलेखा – अच्छा, मग धुवायला कशात टाकायचे असतात ?
रोहित – बादलीत 😦 टाकतो मी, दे इकडे.
सुलेखा – मग इकडे ये नालायका. ( रोहित मार खात ..) का … का तुम्हीं लोकं माला त्रास देता. तुझी room बघितली ? किती पसारा आहे ? पांघरुणाची घडी न करता तसाच गेला खेळायला. पुस्तकं अजुन तशीच आहे टेबलावर. रोज़ मी सगळ घर आवरते तरी पून्हा पून्हा तेच करा. तुम्हांला रविवारची सुट्टी पण मला यातनं कधीही सुट्टी मिळणार नाही. मरेपर्यंत मी हेच करत राहणार. आता मात्र सुलेखाचा ताबा सुटतो आणि तिचे डोळे भरून येतात. ती रडक्या स्वरात स्वतःशी काहीतरी पुट्पुट्त किचनमधे निघून जाते. रोहित bathroom मधून रूमकड़े जाताना म्हणतो ‘ बाबा किचनमधे पाउस पडतो आहे, जरा बघाना..’

श्यामराव किचनमधे जातात. सुलेखाचे अश्रु पावसासारखे गळत असतात. तिच्या खांद्यावर हाथ ठेवून म्हणतात ‘ सुलेखा तू का इतका त्रागा करून घेतेस. घेऊ ना आपण नवा टीव्ही. एकदा रोहितची ट्यूशन fees भरली की झालं. अगं आता पुढे दहावीच वर्ष न त्याचं. कुणास ठाउक अजून किती पैसे लागतील? बस एकदा ते होवू दे मग देतो न मी तुला नविन टीव्ही घेउन.’ सुलेखा न बोलता पोहे plate मधे काढते आणि समोर करते. श्यामराव म्हणतात ‘ जळके, काही हरकत नाहीं’. जळके नाहीं ते, नवीन कांदा कापला.
तेवढ्यात रमणीक सेठ दारावर थाप मारतात. ‘नमस्कार श्यामराव’ … ‘अरे आत या ना’… ‘नको नको.. कामावर जायचं आहे, आम्ही धंदेवाला माणस ना. बरं असं ऐकल की तुम्ही नविन टीव्ही घेणार म्हणून? तुमच्यासाठी एक मस्तं deal आहे. आमच्या साळ्याचं दुकान आहे पार्ल्याला. एकदम स्वस्तात मिळेल. फकत २ हजार द्यायचे सुरुवातीला बाकी installment. आता आमचे २ हजार आहे तुमच्याकड़े उधार …. पण कधी मागितला काय ? पण टीव्ही installment वर व्याज लागेल . आम्ही तर तुमच्याकडून कधी व्याज भी घेतला नाहीं.’ हे ऐकून सुलेखा किचन मधन बाहेर येते आणि रमणीकसेठ्च्या हातावर २ हजार रुपये ठेवते. रमणीक आनंदात म्हणतात ‘अरे वाह…मग आजच आणायचा का टीव्ही?’ ‘टीव्हीसाठी गोळा केले होते पण तो आता चालायला लागला आहे म्हणून हे तुमची उधारी चुकवण्यासाठी दिले आहेत’ असे म्हणत सुलेखा किचनमधे निघून जाते. रमणीक निघून जातात पण श्यामराव अजूनही बंद टीव्हीकड़े बघत असतात.

पिंकी रोहितला – ‘दादा ढग दिसत आहेत’
रोहित – कुठे, पुन्हा किचनमधे ?
पिंकी – नाही, ह्यावेळी ते hall मधे जमा झाले आहेत.

– श्रीकांत 🙂

———————————————————————
सुलेखा आणि श्यामराव ही पात्रं बहुदा आपल्याला सगळ्याच घरी भेटतील. IT च्या भाषेत सांगायचं म्हंटल तर एखादं Application जर crash झालं तर manager ( सुलेखा) ची होणारी चिडचिड, DEV व QA ( श्यामराव ) च patch work किंवा stress testing, Build आणि Doc team ( रोहित, पिंकी ) चे सल्ले अशी परिस्थिति निर्माण होते 🙂 पण खरतर application आणि घर किंवा संसार यात खूप फरक आहे. Application मधे गुंता हा coding किंवा testing चा असतो पण घरात मात्र तो गुंता असतो परिस्थितींचा. आणि अश्या परिस्थितींना एकमेकास सहाय्य करुनच तोंड देता येते. काय राव पटतं का आपल्याला ?
आपले सुविचार, भावना आणि प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा 🙂
आपलाच…
– श्रीकांत 🙂

Read Full Post »

बस स्टॉप…

रात्रीचे म्हणा किवा संध्याकाऴचे आठ वाजले होते. महालक्ष्मी स्टेशन समोर असलेल्या बस स्टॉपवर मी बसची वाट बघत होतो. माझ्या डावीकडे एक तरुण उभा होता त्याचे वय असेल साधारण सतरा ते अठरा, आणि तो मोबाइल वर आपल्या मैत्रिणीसोबत बोलत आहे असा मी अंदाज़ घेतला. त्याच्या पोरकट गोष्टींमधे काहीही रस नसल्यामुळे मी माझ लक्ष दुसरीकडे वळवलं. रस्त्यावर जास्त रहदारी नव्हती कारण आज सुट्टी असल्यामुऴे ट्रफिक कमी होतं. समोरच्या बस स्टॉपवर मला एक सुबक ठेंगणी मुलगी दिसली. जशी काय ती मझ्याकडेच बघत आहे असा विचार करुन मी माझी पोझ निटशी केली आणि हाताची घडी करुन आपला संपूर्ण तोल त्या बस स्टॉपच्या लाल खांबावर सोडून एखाद्या हीरोसारखी पोझ दिली. आता बघेल मग बघेल अस करता करता १० मिनिटे निघून गेली तरीही तिने एकदा पण लक्ष दिलं नाही. रागात मी पण माझ लक्ष बाजूच्या होर्डींगकडे वऴवलं . कसल्यातरी मॉलच ते होर्डींग होतं आणि त्यावर बिपाशा बासुचा फोटो होता. ती तरी माझ्याकडे आनंदाने बघत आहे या विचाराने मी खुश झालो. मी जेव्हां माझ लक्ष पुन्हा बस स्टॉपवर केंद्रीत केलं तर तिथे कोणीही नव्हतं. सुबक ठेंगणीचा कुठेही पत्ता नव्हता. हताश होऊन मी पुन्हा त्या होर्डींगकडे बघू लागलो पण यावेऴी डोक्यात काहीतरी वेगऴेच विचार चालले होते.

का बर ती मुलगी निघून गेली, माझा चेहरा तिला आवडला नाही का ? मी तर काही पण टवाऴक्या केल्या नाही मग तरीही बस न येता ती कुठे गेली ? बहुदा तिने लोकल गाठली असेल असा विचार करत असताना माझ लक्ष त्या होर्डींग खाली गेलं. तिथे एक बाई एका लहानशा मुलीला कुशीत घेऊन बसली होती. तिच्या अंगावर मोजकेच कपडे होते आणी समोर जमिनीवर एका कापडावर एक दोन नाणी होती. हे सगऴ बघत असतानाही त्या सुबक ठेंगणीचा विचार माझ्या मनात अजूनही घोऴत होता. अचानक माझे आणि त्या चिमुकल्या पोरीची नजरानजर झाली आणि ती हात समोर करून माझ्याकडे बघत होती. आपण एका भिकारीण आणि तिच्या लहानशा बाऴाकडे किती वेऴापासून बघतो आहे हे माझ्या लक्षात आले आणि मी माझ लक्ष दुसरीकडे वऴवलं. तर बघतो की माझ्या डावीकडे असणारा तरूण माझ्याकडे एकदम रागाने बघतो आहे. मी तिथेच सरऴ उभा झालो व बाजूच्या बाकावर बसलो. तरीही तो तरूण मला खून्नस देत होता.बहुदा माझ त्या भिकारीणकडे टक लावून बघणे त्याला आवडल नसेल. पण त्याला मी कस समजवणार की हा सगऴा घोऴ त्या सुबक ठेंगणीमुऴे झाला. त्याचा विचार सोडुन मी पून्हा त्या चिमुकलीकडे बघितलं तर ती पून्हा हात समोर करून माझ्याकडे बघत होती.त्यावेऴी मला सगऴ्यांचा राग आला आणि का बरं मी इतकया वेऴापासून बसची वाट बघतॊ आहे असा विचार करत मी घड्याऴाकडे बघितलं तर पावणे नऊ झाले होते. आणि बसचा अजूनही पत्ता नव्हता. चिडून मी माझ लक्ष इकडे तिकडे नेलं आणि नेहमीप्रमाणेती चिमुकली माझ्याकडे हात समोर करून बघत होती.

पण ह्यावेऴी नक्की हिचा प्रोबलेम काय असा मी विचार केला आणि तिच्याकडे नीट लक्ष दिलं. तिचे डोऴे हे पाणावलेले होते. इतक अंतर असूनही ते चमकत होते. तिच्या अंगी असणारा “frock” हा तिच्या मोठ्या बहीणीचा असावा असा मी अंदाज लावला. ती एका हाताने आपला उजवा डोऴा पुसत होती आणि तिचा डावा हात अजुनही पुढ़े होता. डोऴे पुसूनही तिच्या डोऴ्यातली गंगा मात्र वाहत होती.पण त्या पाण्याला खऴखऴाट नव्हता. निमूटपणे का असेना ती रडत होती. तिच्या त्या नाजूकश्या पापण्या अजूनही ओल्या होत्या. समोर एकीकडे माझ्याकडे हसत बघणारी बिपाशा होती तर दुसरीकडे रडतं असणारी ही चिमुकली, किती अंतर होत त्या दोघींच्या डोऴ्यात . बिपाशाचे ते सुंदर आयलेशेस लावलेले डोऴे असुन सुध्दा ते त्या चिमुकलीच्या डोऴ्यांपुढ़े ओसाड होते. लहान कापलेले केस, सुंदर मेकप आणि अंगी असलेला शार्ट स्कर्ट असुनही ती या लहान चिमुकलया रडक्या चेहरयापुढ़े ती कमी पडत होती. कारण होते ते डोऴे. त्या चिमुकलीच्या डोऴ्यात तिच्या पोटातली भूख दिसत होती. तर त्या बिपाशाच्या चेहरयात तीची कृत्रीम सुंदरता दिसत होती. किती फरक असतो ना अमिरी आणि गरीबी मधे. ती बिपाशा जरी या विकेंडला जॉन बरोबर ताजमध्ये पाच हजाराचा डिनर करत असेल पण ही चिमुकली मात्र अजूनही त्या पाच रुपयाच्या दूधाची वाट बघत असेल.

हा विचार करत असतांना मला सकाऴी घेतलेल्या पाच रुपयाच्या बिस्किटांच्या पूड्याची आठवण झाली. मी तो लगेच बाहेर काढ़ला आणि त्या चिमुकली कडे बघितलं, तीचा हात अजूनही पुढ़े होता. एका क्षणाचाही विचार न करता मी लगेच रस्ता ओलांडला आणि तो पुडा तिच्या हातावर ठेवला. त्यातल्या काही बिस्किटांकडे बघून तिच्या चेहरयावरच्या त्या अप्रतीम स्माइलचे वर्णन मी आज पण करु शकत नाही. तीने अलगदच एक बिस्किट काढ़लं आणि आपल्या आईला दाखवलं आणि तिने मोठया आनंदाने स्वताःच्या तोंडात टाकल . तिचा तो आनंद बघून मला फार समाधान वाटल आणि माझ्या डोऴ्यातलं पाणी पडण्याच्या आत मी पून्हा माझ्या जागी परतलो . तेवढ़्यात माझ्या डावीकडे असणारया तरुणाने मला एक “chewing gum” गम आफर केलं. ते मी अलगद घेतलं आणि तोंडात टाकलं. यावेऴी मात्र त्याच्या चेहरयावर एक वेगऴीच स्माईल होती.

मी त्या चिमुकलीकडे बघितलं तेव्हा एखादी राजकन्या जेवणाचा आस्वाद घेत आहे अशाप्रकारे ती बिस्किटांचा आस्वाद घेत होती. तेव्हा मला समोर असलेल्या बिपाशाकडे बघून वाईटवाटले. ती जरी आज बालिवूडची नामी अभिनेत्री असली तरी आज माझ्यासाठी तर हीच चिमुकली मोठी अभिनेत्री होती. हे विचारचक्र चालू असताना माझी बस केव्हा आली हे कऴलचं नाही. मी लगबगीने बसमध्ये चढ़लो आणि सिटवर बसलो. माझ लक्ष आताही त्या चिमुकलीकडेच होतं.ते बिस्किट तिला आवडतात कि नाही हे मला बघायच होतं. ऐवढ़्यात मला कोणी तरी हाक मारली ” Can I have a Seat please !!! ” मी लक्ष न देता बाजुला सरकलो आणि बाहेर बघितलं यावेऴी त्या चिमुकलीच्या चेहरयावर वेगऴाच आनंद होता. तिचा हात पूढ़े नसून वरती होता. मी पण तिला हात दाखवला आणि पुढ़े बघितलंतर समोरच्या सगऴ्या सिट रिकाम्या होत्या आणि बाजूला बघितलं तर होती तीच सुबक ठेगंणी 🙂

– श्रीकांत 🙂

This is first time I am trying my hands on the short stories which are some how different than my regular hindi poetry and its difficult for me to switch from hindi to marathi.. but still i tried my best. I hope you guys will like it 😛

So whats the moral of the story…I tried to explain in my way but whats your thought on this ? Please let me know ….

Read Full Post »

शब्द माझे ..

शब्दांचं आणि भावनांचं फार जवळचं नातं अस्तं आणि त्यामुळेचं भावना व्यक्त करतानाही शब्दांची गरज़ पड़ते. आपण कितीही प्रयत्न केला तरी शब्दांविना त्या भावना अपुर्या वाटतात. एखाद लहान मूल जेव्हां पहिल्यांदा ‘आई’ किवा ‘बाबा’ असे शब्द उच्चारतो तेव्हां आपल्या किती आंनद होतो 🙂 कारण त्याच्या त्या भावनांची आपल्या जाणीव होते. किवां कधी अचानक पायाला ठेच लागली की आपल्या तोडून नकळत ‘आईगं’ असे शब्द बाहेर पडतात. याला कारण पण तेच नकळत का होएना आपल्या भावनानंच शब्दांमधे रूपान्तर होतं.

तर अशा माझ्या, तुमच्या आणि कित्येकांचा भावना या ब्लॉग थ्रू व्यक्त करण्याचा निश्चय मी केला आहे. आपल्या रोजच्या आयुष्यातील वेगवेगळे व्यक्ति, प्रसंग, आचार-विचार सवतः च्या शब्दात मांडन्याचा प्रयत्न मी करणार आहे.

तसा मी मुळचा नागपूरकर पण पुणेकरना पटेल अशा शुद्ध मराठीत लिह्न्याचा मी प्रयत्न केला आहे. आशा करतो की माझ्या या प्रयत्नांची चीज़ होईल.

– श्रीकांत 🙂

P.S : Please forgive me for the mistakes with the text and grammer and I know its not shudhha marathi but I am trying my best 😉

Read Full Post »