Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

एवढ्यात “अहो SSSS ….” अशी हाक तिला ऐकू आली. ऐमिली जरा भानावर आली. कोण एवढ्या जोऱ्यात ओरडत आहे आणि काय म्हणत आहे हे तिला कळे ना. तिनी झटकन रेलिंग ला पकडलं आणि तिचा तोल सावरला. मागे वळून बघते तर तिचं लक्ष पुढे बैचं वर बसल्या एका जोडप्या कडे गेलं. ते काय बोलत होते तिला कळत न्हवत पण तरी तिचं लक्ष त्या बाईच्या कपड्यान कडे गेलं. यांनी मला तर बघितलं नाही, आणि हि बाई मला काही म्हणत आहे का ? असा विचार करत, जवळ असलेल्या एका स्ट्रीट लाईटचा आडोसा घेऊन ती त्यांना बघू लागली. या बाईनी हे काय घातलं आहे या वर ती विचार करत होती.

समोर बैचं वर Mr and Mrs दामले बसले होते. Mr and Mrs का कारण दामले सगळ्यांना अमेरिकेत असाच परिचय द्यायचे. तर या नदीकाठी ते पण city view चा आनंद घेण्यासाठी बसले होते. आणि मिसेस दामले त्यांना काहीतरी म्हणत होत्या. अहो… काढा ती टोपी आता, Englishman ..शोब्तं का तुम्हाला. तुला फारच शोब्तं, दामले म्हणाले. साडी घालून बसली आहे न्यूयॉर्क मधे. अरे I look like people here, you don’t. मधेच दोन तीन इंग्रजी वाक्य टाकून बायकोला चूप करण्याची दामलेंची जूनी सवय. कारण त्यांचा सगळा जन्म पोस्ट मास्तरकीत गेला आणि मिसेस दामलेंचा २ पोर आणि ३ पोरी सांभाळण्यात. मिसेस दामलेना राग आला आणि त्यांनी आपलं तोंड फिरवत दुसरीकडे बघितलं. दामले म्हणाले, अगं मने असं काय करते, हात दे बरं तुझा. असं म्हणत त्यांनी तिचा हात पकडायचा प्रयत्न केला. पण मिसेस दाम्लेना बिलकुल आवडलं न्हवत. त्यांनी हात स्वतः कडे आणखीन खेचला. पुन्हा दामलेंनी जबरदस्तीनी तीचा हात आपल्या हातात घेतला. आणि हातावरच्या रेषा बघत ते बोलले “किती काम करते ग तू या हातांनी “. आता कशला तुम्हाला चिंता, या हत्तांनी तुमचे सकाळेचे पोहे बनवले, पांच पोरांना सांभाळले, तुमच्या आई वडलांच केलं आणि आज तुम्हाला माझ्या हातांची आठवण येते. दाम्लेना कळलं होतं आता बायको भडकली. हे वाक्य मी बोलायला नको होतं , सगळ्या नवऱ्यान प्रमाणे आपण हि चूक नेहमी का करतो, असं म्हणत त्यांनी आपली मान हालवली. असं नाही मने, मी केंव्हा म्हंटल कि तू काही काम केलं नाही. आणि हि होती दुसरी चूक. आता दामले मडमचा पारा आणखीन चढला. हो म्हणा अजून. कि कामं केली नाही, काही तरी चुकलं असेल ना, पोह्यांमध्ये मिरच्या कमी पडल्या वाटतं आज सकाळी, किवां चहा मी आजकाल तसा बनवत नाही जसा २० वर्षांपूर्वी बनवायची ना ? सुधारा आता तरी तुम्ही ७० चे आणि मी ६५ ची झाली आता. मिसेस दामलेंनी हे इतकं भर देऊन म्हंटल कि एमिली सोबतच रस्त्यावर जाणाऱ्या सगळ्यांनी ऐकलं. एका कडे कुत्रा होता तो पण मान वळून मिसेस दामलेन कडे बघायला लागला. एमिलीला हे बघून हसू आले. हि बाई किती जोऱ्यात ओरडली तिच्या ..नवऱ्यावर … पक्का हा नवरा असेल असं स्वतःशी ठरवत ती त्यांच्या कडे पुन्हा बघू लागली.

Mr दामलेंना आता पूर्ण कळलं होतं कि disaster झालं आहे आता recovery mode सुरु करवा लागेल. असं नाही मने …. ते पुन्हा बोलले ….”मग कसं म्हणे ?” दामले मडम ओरडल्या. दामले बोलले शांत हो जरा हे आपलं कोथरूड मधलं डहाणूकर कॉलोनीतला फ्लाट नाही आहे . कि तू आपलं ओरडून प्रत्येक वाक्य मला सांगशील. इथे पोलीस पकडतात बरं असं रस्त्यावर ओरडलं तर. मिसेस दामलेंनी पुन्हा लक्ष दुसरीकडे वळवलं आणि त्या कमी आवाजात बोलल्या . बरं आहे पकडून नेलं तर तुम्हाला. दामले बोलेले काय ? …त्या म्हणाल्या काही नाही ..मने तुझी ही सवय ना कधी जाणार नाही …मला आठवतं जेंव्हा दापोलीला आंब्याचा बागेत झाडावर तुला आंबा खाताना बघितलं होता. तू इतकी गुंग होती त्या हापूस मधे कि आपले कपडे भरले आहे कि नाही काही कळलं नाही तुला. आणि जेंव्हा मी विचारलं तेंव्हा मलाच बोलली …दिसत नाही का ? …आंबा खाते आहे म्हणून ..त्यावरून मला बोलली त्यासाठी मेहनत करावी लागते …आणि तुझा तो आवाज ऐकून त्या बागेतला तो दगडू काका आला ना काठी घेऊन आणि लागला माझ्या माघे … मिसेस दामलेंचा लक्ष अजून दुसरीकडे होते पण चेहऱ्यावर एक हास्य आलं होतं . तरी त्यांनी आपला attitude change केला नाही त्या अजून पण हाताची घडी करून अकडून, तोंड फिरवून बसल्या होत्या . दामलेंनी पुन्हा प्रयत्न केला, मने हाथ दे ना इकडे .. या वेळी मिसेस बोल्या, मी नाही देणार, चला आता घरी …वेळ झाला ..प्रकाश वाट बघत असेल …वाट तर तो कलार्क बघत बसला होता तुझ्या वडलांच्या पत्राची. आणि पत्र मिळालं पण त्याला पण त्यासोबत आणखीन एक निनावी पत्र होतं. आत्ता मात्र मिसेस दामलेंनी Mr दाम्लेंकडे तोंड फिरवलं आणि विचारलं कोणता कलार्क, कोणतं पत्र, तुम्हाला कसं माहित. Mr दामले आता सरळ मन्हाटनकडे बघत होते. त्यांनी आपली नवीन टोपी जरा सरळ केली आणि एक झटक्यात मफलर गळ्याच्या दुसऱ्या भवती गुंडाळलं आणि style मधे उठत बोलले, चाल घरी जाऊ . मिसेस दामलेंनी त्यांना खाली खेचला आणि विचारलं …कोणतं कलार्क ? तो रत्नागिरीचा जो मला बघून गेला होता आणि बाबा त्याची वाट बघत राहिले पण उत्तर आलं नाही. हो तोच , त्याला अजून पण वाटत कि तुला एका कानानी कमी ऐकू येते आणि म्हणूनच तू बोलताना जरा मोठ्यांनी बोलते. अय्य्या ….. कोणी सांगितलं हे खोटं त्याला. सोड ना, आता अग किती वर्ष झाले त्याला आणि तुला येत ना ऐकू बरोबर. नाही.. नाही. सांगा मला, कोण बोललं. दामले हसत तिच्याकडे बघत बोलले. मीच त्याला निनावी पत्र टाकलं होतं. का… तुम्ही असं का केलं. आंब्याचा झाडावर तू आंबा खात होती आणि माझ्या माघे तो दगडू लागला होतां. मी पण विचार केला, दगडू तर माझा पिच्छा सोडेल पण मी तुझा नाही सोडणार 🙂 मिसेस दामलेंच्या चेहऱ्यावर थोडं हसू आलं आणि मग ते लपवत त्यांनी Mr दाम्लेना म्हंटल. काय हो तुम्ही, माझ्या दोन बहिणींच्या लग्नाला पण किती उशीर झाला. सगळे समजत असतील आम्हा पोरीना कमी ऐकू येत म्हणून. हेट ..काही पण, दामले बोलेले. चांगल्या घरी गेल्याना सगळ्या मग. काय तू पण. वरून तो कलार्क अजून पण रत्नागिरीतच आहे आणि तू बघ न्यूयॉर्क मध्ये. आता हात कर पुढे. मिसेस दामलेंनी लाजत हात पुढे केला, आपला नवर्यानी त्या काळी आपल्याशी लग्न करण्यासाठी असं काही केलं होतां हा विचार करून, कितीही लपवून सुद्धा त्यांचं लाजणं चेहऱ्यावरून लपत न्हवत. Mr दामलेंनी एक Mango candy त्यांच्या हातावर ठेवली. हे काय ? दामले बाईनी विचारलं. “This is Mango Candy my dear” …म्हणजे ? मिसेसनी विचारलं. अग आंब्याची गोळी. आच्छा… कुठून आणली ? सकाळी रोहित शाळेत जात होतां ना त्याच्या बैग मधनं चोरली 🙂  काय अहो, तुम्ही नातवाच्या बैग मधनं चोकलेट चोरता ? शोब्तं का तुम्हाला ? अरे चोकलेट चुराया तो कीस के लिये. मेरी जानेमन के लिये. हे ऐकून Mrs दामले खूप जोर्याने हसू लागल्या …

मिसेस दामलेंच हसणं ऐकून ऐमिली भानावर आली. तिला आपण काय करत होतो आणि जेम्स काय करत असेल याची जाणीव झाली. उशीर झाला आहे आणि आपण घरी जायला हवं असं तिला वाटलं. Mr and Mrs दामलेंची भाषा तिला कळली न्हवती पण त्या हाव भाव वरून तिला इतकं काही कळलं होतं कि तिनी घरी वापस जायचा विचार केला. सायकलींग करत जेंव्हा ती घरी आली तर तिला बिल्डिंग बाहेर पाऱ्यानवर जेम्स बसला दिसला. त्याचा हातात बास्केट बाल होता आणि हातावर फिरवत तो आपल्या विचारात गुंग होता. त्याला नकळत ऐमिली त्याचा बाजूला जाऊन बसली. जेम्सनी तिच्याकडे बघितलं आणि तिचा जो हात त्यांनी घट्ट पकाडला होता त्याला स्वतःच्या हातात घेऊन  म्हणाला. ” I am sorry. I shouldn’t have held it so tight.” तिच्या हातावर हात फिरवत एक चोकलेट ठेवत तो तिला बोलला “Could you please forgive me baby” ? ते चोकलेट बघून ऐमिलीचा बांध तुटला . टप टप करत तिचे ते अश्रू त्या चोकलेटवर पडू लागले. रडक्या आवाजात ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत बोलली , “You should not be Sorry, I am sorry James. I will not go there from tomorrow. We will find some other place which is safe to take my classes.” जेम्सनी त्याच्या दुसरा हात तिच्या खांद्यावर ठेवला आणि तिला घट्ट पकडलं. एक वेगळीच शांतता होती, छान वारा वाहात होता. तिसऱ्या माळ्यावरच्या खिडकीतनं ” What a wonderful world…..” असं एक जैझ्झ गाणं ऐकू येत होत. आणि पुढच्या फुटपाथवर एक वयस्क बाई पुन्हा …”these kids” म्हणत आपल्या घरी जात होती ….

————————————————————————————————————-

दोन वेगळ्या जगातील जोडपे एक एकदमचं broad minded, आजच्या काळातलं एकदम खरं अमेरिकन. तर एक एकदमच जुन्या काळातलं, जुन्या परिस्तिथीतलं. पण ते कितीही वेगळे असले तरी खूप काही शिकवून जातात. हेच एमिलीला योग्य वेळी कळलं. लोक बदलतात, काळ बदलतो, परिस्थती बदलते. पण जे बदलत नाही ते म्हणजे प्रेम ……काय वाटत तुम्हाला … ?
– श्रीकांत
Advertisements

न्यू जेर्सिच्या समिट अवेन्यू वरील पंधराव्या स्ट्रीटवर बिल्डिंग ६०३ मध्ये दुसऱ्या माळ्यावर जेम्स हा एमिलीची वाट बघत होता. त्यानी सह्व्यांदा एमिलीचा फोन ट्राय केला पण तरी फोन नुसता वाजत होता.आता जेम्स संतापला होता, त्यानी फोन खाडकण आपटला आणि तो सरळ लिविंग रूमच्या खिडकीकडे वळला.बाहेर रस्त्यावर कुठे ऐमिली दिसते का, हे त्यानी बघितलं. संध्याकाळचे ६ वाजले होते, उन्हाळा असल्यामुळे अजून अंधार झाला नव्हता पण लवकरच होणार होता. मागच्या एक तासा पासून तो ऐमिलीचा फोन ट्राय करत होता आणि आता त्याला तिची फार काळजी होत होती. सकाळी कामावर जायच्या आधी त्याचं ऐमिलीचं थोडं वाजलं होतं.तसं नेहमी त्यांचं भांडण होत नाही.आता अल्मोस्ट वर्ष झालं होतं दोघांना एकमेकान सोबत राहून पण जेंव्हा पण वाजायचं तेंव्हा नॉर्मल व्हायला खूप वेळ लागायचा.आणि आजचा दिवस तसाच काहीतरी होता.

जेम्सला ऐमिलीचं ब्रुकलीनमधे जाऊन कूकिंगचे क्लास्सेस घ्याची आयडिया बिलकुल पटली न्हवती. नेहमी तिला घरी परत यायला खूप वेळ व्हायचा आणि कूकिंग असा विषय असतो जो ठरल्याप्रमाणे कधी वेळेत पूर्ण होईल कि नाही याची गेरंटी नसते. जेम्स ऐमिलीला सकाळीच बोलला “तो एरिया चांगला नाही आहे आणि मला तुझं तिथे जाणं आवडत नाही,बंद कर तो क्लास आणि अजून कुठे जाऊन शिकव.खूप अश्या जागा आहेत जिथे तू शिकवू शकते.” तरी पण आज एमिली क्लास घ्यायला गेली आणि त्यामुळे त्याचा पारा फार चढला होता. त्यानी ऐमिलीची फ्रेंड जोनाला फोन लावला, तिनी सांगितलं ऐमिली आताच निघाली आहे आणि पोहचेल.जेम्सनी पुन्हा खिडकीतनं रस्त्यावर डोकावून बघितलं.अजून ऐमिलीचा कुठेही पत्ता नाह्वता. तेवढ्यात त्या स्ट्रीट कॉर्नरवर कोणीतरी सायकलवर येतांना दिसलं. त्यानी कोण आहे बघण्याचा प्रयत्न केला. स्कीन ताईट ब्लैक पैन्ट,त्यावर पिंक जैकेट,डोळ्यांच्या भवती डार्क काजळ, होटांवर स्टील पियरसड रिंग्स आणि कानावर मोठे हेडफोन्स. त्याने लगेच ऐमिलीला ओळखलं आणि तो स्वतःशी पुटपुटला “i knew it”.

खाली जिन्या जवळ ऐमिलीनी सायकल लॉक केली. आणि “du hast, du hast mi” असं ओरडत ती पायऱ्या चढत होती. तिनी जेंव्हा दार उघडलं तेव्हां तिला समोर जेम्स बसला दिसला. तिनी हेडफोन्स काढत त्याला विचारलं. अरे तू लवकर आला आज. “मी नाही लवकर आलो तू उशिरा आली” असं जेम्स म्हणाला. आपलं सकाळीच बोलणं झालं ना कि तिकडे जायचं नाही म्हणून. तुला किती वेळा सांगितलं तो एरिया safe नहीं, वरून तुझी सायकलनी जाण्याची झीद्द. किती वेळा फोन केला मी तुला ? “तू मला फोन केला केंव्हा ?” ऐमिलीनी विचारलं. तुला काही कसं वाटत नाही ? तू नेहमी अशी का वागते ? आता ऐमिलीचा चेहरा पडला, ती जेम्सला बोलली, कोणत्या विश्वात वावरतो तू, I can handle myself. फालतू चिंता करतो. तुझ्या फ्रेंडला कोणी रोब केलं तर असं थोडी होतं, कोणी मला पण रोब करेल. ऐमिली तुला एक cockroach जरी दिसला तर तू घाबरते. Don’t give me that damn bloody reason Emily.आता ऐमिली पण भडकली, तुला वाटतं कि मी तुझ्यावर अवलंबून असायला पाहिजे. मी जेंव्हा इथे मूवइन झाली होती तेंव्हा आपलं ठरलं होतं, You will do your things and I will do mine. And don’t ever interfere in my life. जेम्स तिच्या जवळ आला, रागानी त्याचे डोळे लाल झाले होते. My life, म्हणजे …I am thinking its our life, how can you say like this. त्यानी ऐमिलीचा हात पकडला. त्याचा तो राग बघून ऐमिली घाबरली, त्याच्या हाताची पकड इतकी ताईट होती कि तिला त्रास होत होतां. ती ओरडली, leave me alone, leave my hand …. जेम्स अजून पण तिचा हात सोडत न्हवता …ती पुन्हा ओरडली.. You are hurting me…James… जेम्सनी तिचा हात एक झटका मारून सोडला.त्याच्या पायाजवळ एक बास्केट बाल पडला होतां, त्यांनी जोऱ्यात त्याला लात घातली… बाल उसळून टेबल लैम्पवर आदळला आणि लैम्प खाली पडून त्याच्या काचा फुटल्या. जेम्सचं लक्ष पण न्हवत, तो सरळ बेडरूम मधे गेला आणि त्यांनी दार खाडकन आपटलं.

ऐमिली सतब्ध होती. सगळं इतक्या क्षणात झालं कि तिला कळलंच नाही. आईचा मनाविरुद्ध तिनी घर सोडलं होतं आणि तिनी जबरदस्तीनी तिला तो लैम्प दिला होतां जो आज फुटला.त्या लैम्पला बघून तिच्या डोळ्यातनं टप टप अश्रू गळू लागले.तिनी पुन्हा बैग उचलली, थाडकिनी दार बंद केलं,खाली गेली सायकल काढली आणि ती चालवत निघाली. तिचे अश्रू अजून पण गळत होते.ती कुठे चालली तिला माहिती न्हवत.आज आईची तिला फार आठवण येत होती.एक वर्षापूर्वी आईला एकट सोडून ती जेम्सकडे आली होती.त्यावेळी पण असचं भांडण झालं होतं आणि ती सगळं समान घेऊन घराबाहेर निघाली. ती १८ वर्षाची असल्यामुळे आईला तिला थांबवता आलं नाही. ते चित्र पुन्हा तिच्या समोर आलं.सायकल थांबवून ती आता जोऱ्याने रडू लागली. तिला स्वतःवर चीड येत होती. फुटपाथवर चालत आसण्यारा एक वयस्क बाईनी तिला विचारलं “Are you ok ? Can I help you dear. ती बोलली “I miss my Mom…” बाई म्हणली “then you should call her dear”.

तिनी फोन काढला अणि आईला फोन लावला,ती रडक्या आवाजात फक्त “Mom are you there ? “एवढंच म्हणली.तिला वोइसमेल ऐकू आला, “Hi, This is Michelle, I am out for Business for two weeks, please leave a message”. मग तिनी फोन ठेवला. वयस्क बाईनी ते बघितलं आणि these kids म्हणत पुढे निघून गेली. आता पुष्कळ रडून झालं होतं, डोळ्यांचं काजळामुळे तिचे गाल काळपट झाले होते.तिनी स्वतःचे डोळे पुसले,काळ्या रंगाकडे दुर्लक्ष्य करत तिचं लक्ष्य समोर हडसन नदी जवळ गेलं . तिनी आपली सायकल तिथे वळवली आणि पार्क करून ती रस्त्यावर चालू लागली …नदीच्या दुसरी बाजू फार छान दिसत होती. अंधार पडून बिल्डींग्सचे दिवे सुरु झाले होते. होबोकनच्या किनाऱ्याहून न्यूयॉर्कचं फार छान दृश्य दिसते. हुड्सन नदी पलीकडे एक वेगळाच जग बघायला मिळतं. नदीकडच्या त्या पार्क मध्ये, आल्यावर ऐमिलीला सरळ किनाऱ्या जवळील रेलिंग दिसलं. ती पुढे रेलिंग जवळ गेली तिनी पाण्याकडे बघितलं आणि मग समोर दिसणाऱ्या मान्हाटन कडे . तिला त्या दृश्य मध्ये काही खास वाटलं न्हवत. मनात खूप साऱ्या विचारांनी गोंधळ केला होता, आपल्या सोबत असं का होते, “Why people don’t understand me, listen me. James also thinks like Mom. Mom is also not there, Nobody loves me” असा विचार करत ती आणखीन रडायला लागली. तिनी पाण्याकडे बघितलं, आणि मग एक पाय त्या रेलिंगवर ठेवला. आता तिचं रडणं बंद झालं होता आणि तिनी विचार पक्का केला होता.तिनी आपले हात मोकळे सोडले होते आणि तिला कळत होतं कि तिचा तोल जात आहे …
———————————————————————-

अजून पुढे पुष्कळ काही आहे, हे तर फक्त ट्रेलर होतं, पिच्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त …..

– श्रीकांत

या जगात सगळ्यात जास्त मॉडर्न जागा कोणती ? असा विचार केला तर त्यात एयरपोर्ट याचा समावेश करण्यात येईल. एयरपोर्ट हि एक अशी जागा असते जिथे तुम्हाला नाना प्रकारचे लोक भेटतात आणि महत्वाचं म्हणजे इथे तुम्हाला लेटेस्ट फैशन पण दिसेल आणि ओल्डेस्ट कपल पण. एयरपोर्टची दुनीया फार वेगळी असते 🙂 तर मुंबईच्या अन्तराष्ट्रीय एयरपोर्ट वर एका टर्मिनल वर मी आपल्या फ़्लाईटच्या बोअर्डिंगसाठी थांबलो होतो. फ़्लाईट ही रात्री उशिराची असल्यामुळे माझ्याकडे टाईमपास करायला खूप वेळ होता. पण लेट नाईट फ़्लाईटचा एक मेजॉर प्रोब्लेम असतो. आपल्याला जागण्याची तितकी सवय नसते, मग झोप येते, डोकं दुखतं, आणि त्यामुळे चीडचीड होते. माझी अशीच चीडचीड होत होती म्हणून मी विचार केला… चला जरा फेरफटका मारून येवू, थोडी झोप उडेल, मी चालणं सुरु केलं, नाना प्रकारचे लोकं दिसत होते, फिरंगी, देसी , ABCD (अमेरिकन बोर्न कॉन्फ्युस्ड देसी) अश्या लोकांमध्ये माझं लक्षं एका दोन वर्षाच्या लहान मुलीवर गेलं. कुरळे केसं, काळा सलवार, हिरवी फुलं असणारा शोर्ट कुर्ता आणि त्यावर गालावर खळी पडणारी सुंदर smile. बहुदा प्रीटी झिंटा लहानपणी जशी दिसत असेल तशी ती दिसत होती. ती मस्त बिनधास्तपणे, डयुटी फ्री दुकानानमध्ये हिंडत होती, तिला कश्याची फिकीर न्हवती, या काउंटर वरून त्या काउंटरवर. मनात असा विचार आला कि हि चालणं आता शिकली असेल आणि त्यामुळे she was enjoying walking. मस्त हसत खेळत, ते छोटे छोटे लहानसे पावलं उचलत तिला बघून फार छान वाटलं. तिची एक आणखीन दोन वर्षांनी मोठी बहिण तिच्या सोबत खेळत होती. रात्रीच्या दोन वाजता या दोन्ही पोरी, ओरडत जे जे आपआपल्या खुर्चीत झोपले आहेत, त्यांची झोप उडवत होत्या. मोठी थोडा वेळ गायब व्हायची आणि मग छोटीला दिसायची, मग ती तिला पकडायला पुढे गेली कि हि पुन्हा गायब व्हायची. मग कळलं कि या दोघींची लपाछुपी सुरु होती.

अचानक धावतांना हि लहानशी चिमुकली खाली पडली आणि तिला बघणारी सगळी जनता एकदम एक पाऊल पुढे सरकली पण तेवढ्यात हि पुन्हा आपल्या पायावर उभी राहून,पुन्हा हसत धावायला लागली. मग विचार पडला कि अरे आपण इला बघण्यात गुंग झालो पण ईची आई कुठे आहे ? आणि मग माझं लक्ष एका कोपर्यात उभ्या असलेल्या एका बाईकडे गेलं. ती खूप हळू आवाजात काही तरी पुटपुटत होती. पायात लांब स्कीन टाईट leather shoes, टाईट जीन्स आणि त्यावर एक फुलांचा असणारा शोर्ट कुरता असा तिचा पेहराव होता. तिचा पेहराव इतका trendy होता कि थोड्या वेळ कळलंच नाही कि हि या पोरींची आई आहे म्हणून 🙂 वरून तिचा काही interference न्हवता त्यांच्या मस्ती मधे. पण तिनी एक limit ठरवली होती, त्या पोरी पुढे गेल्या कि ती त्यांना हाक मारायची, पण त्याचवेळी तिचं बाकी प्रवाश्यानकडे लक्ष होतं, बोर्डिंग गेट वर लक्ष होतं, announcement वर लक्ष होतं आणि तेवढ्यात अचानक मला national geographic वर आधीच्या दिवशी बघितलेली एक documentary आठवली . ती एक वाघिणीवर आणि तिच्या बछाडयांवर होती. जन्मापासून ती कशी त्यांची काळजी घेते हे त्यांनी दाखवलं होतं. ते बछडे जसे थोडे मोठे होतात, ते मस्ती करतात, छोट्या पक्ष्यांना पकडण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या आईच त्यांच्याकडे बरोबर लक्ष असतं फक्त ती कोणाच्या act मधे दखल देत नाही, जो पर्यंत गरज नसेल तोपर्यंत. ती साम्यता मला या आईत दिसली आणि फार छान वाटलं. नाही सगळ्या आया बहुदा हेच करत असतील पण हि आई जरा वेगळी होती. कारण ती आजच्या जगातली नारी, आपल्या पोरीना पुढे कोणत्या जगाला तोंड द्यायचं आहे याची तिला बरोबर जाणीव होती आणि बहुदा ती त्यांना त्या साठीच ट्रेन करत होती. जसा हा विचार माझ्या मनात पेटला तसच मला इतकं आश्चर्य वाटलं, आपण मनुष्य स्वतः ला फार ग्रेट समजतो, आपण civilized झालो, थोडं शिकलो तर आपल्याला वाटतं आपण या जगात फार श्रेष्ठ आहे पण जेव्हां आपल्या वागण्यात अशी काही साम्यता दिसते तर मग तोच जूना principle लक्ष्यात येतो कि आपण वानरांचे वंशज आहोत. Moral of the story : we are nature and nature is us. बस आपला बघण्याचा दृष्टीकोन फार बदलत चालला आहे. जर आपण या गोष्टीचा एकदा तरी विचार केला तर We will get more closer to the nature. Will try to stop destroying nature and will work for some good cause.

पुन्हा लक्ष त्या चिमुकली कड़े गेलं. ती धावत आली आणि आपल्या आईच्या पायाला बिलगली. तिच्या आईचं लक्ष अजून पण बोर्डिंग गेटवर होतं. मोठी पोरगी पण आता आई जवळ आली. दोघी पण आईच्या अवती भवती फिरत होत्या. एकमेकांना पकडण्याचा प्रयत्न करत होत्या. मोठी छोटीला त्रास देत होती, कधी तिचे केस ओढणार तर कधी तिचा फ्राक आणि मग दूर पळून जाणार. लहान चिमुकलीनी ममा… ममा… असा खूपदा आवाज केला पण तिच्या ममानी काही तिच्याकडे लक्ष दिलं नाही. मग अचानक ती तिच्या पासून दूर गेली. एक जागी display चा टीव्ही लागला होता. त्याच्यावर काही channel चालू होते. तिचं लक्ष त्या टीव्हीवर गेलं आणि ती एकदम शांत झाली. तिचं पूर्ण लक्ष त्या टीव्हीवर होतं. ती शांतपणे बदलणाऱ्या चित्रांकडे टक लाऊन बघत होती आणि मग अचानक. “Top songs of 2011 ” त्यावर लागले आणि धनुषचं “व्हाय दिस कोलावरी….” गाणं सुरु झालं. ते बघून तिच्यात एकदम energy आली. बहुदा तिनी ते गाणं आधी ऐकलं असेल आणि मे बी तिचं favourite असेल !!!! . ती आपल्या style मध्ये नाचायला लागली, तिला बघून एक दोन पोरं पण तिला जॉईन झाले . सगळे कल्ला करत होते आणि मग तिच्या आईचं लक्ष तिच्याकडे गेलं, ती तिला बघून हसली आणि तिनी डोक्यावर हात ठेवला. background मधे गाण्याचे बोल सुरु होते …सुपर ममा …रिदम करेक्ट … आणि बहुदा हि चिमुकली पण आपल्या आईला हेच म्हणत होती 🙂

– श्रीकांत

आर यू अ Rockstar आफ यूअर लाईफ ?

काही दिवसांपूर्वी Rockstar हा सिनेमा बघितला.  बहुतांश लोकांना आवडला नसेल पण मला फार आवडला. जॉर्डनच जे पात्र रणबीर नी साकारलं आहे ते अप्रतिम आहे. सिनेमात flaws आहेत, काही जणांना शेवट नाही आवडला तर काहींना नर्गिस आणि जॉर्डनची लव स्टोरी नाही पटली. असो… आपला नेहमीचाच प्रोब्लेम आहे, स्वतः आपण परफेक्ट नसून आपल्याला बाकी सगळं जग नीट नेटकं हवं. पण कधी विचार केला का, कि आयुष्यात आपण जसं असेल तसं व्यक्ती आणि परिस्थितीचा स्वीकार का करत नाही ? अस केल्यास खूप सोपं होतं एखाद्या कठीण परिस्तिथीशी किवां नावडत्या व्यक्तीशी डील करताना. हो, हे सोपं नाही आहे पण अशक्य पण नाही आहे. तर मी पण जॉर्डन ला तो जसा आहे तसं एक्सेप्ट केला आणि मग मला त्याचं विश्व कळलं. आणि सिनेमा संपल्यानंतर मनाची घालमेल सुरु झाली. का आपण लोकांचा विचार करतो ? का लोकांना आपल्या जीवनात काय घडत आहे याची उत्सुकता असते ? आपण का एकद्याबद्दल मत बनवतो ?  आपण लोकांची किंवा लोक आपली निंदा का करतात ? आणि महत्वाच म्हणजे याचा आपल्याला किती त्रास होतो !!!

आणि मग एक महत्वाचा प्रश्न डोळ्यांसमोर आला “Are you a Rockstar of your life ?” खरतर एखाद्या रौक कौनसर्ट मधे आपल्याला पुढची सीट हवी असते, त्या Rockstar चे फोटो काढायेचे असतात, ते facebook वर अपलोड करायचे असतात, त्या चालीवर नाचायचं असतं पण आपल्याला त्याच्या जागी उभं राहायचं नसतं, परफोर्म करायचं नसतं ? का ? We want to be a rockstar but at the same time we dont want to be in his shoes .

कारण आपण घाबरतो, आपण आनंद व्यक्त करताना पण घाबरतो आणि दुखः व्यक्त करताना पण. मनातले विचार फक्त मनात ठेवतो आणि संपूर्ण जगाला कोसतो. आपण स्वतःला फसवतो आणि जगाला दोष देतो.  जोर्डन आणि आपल्यामध्ये काही फरक आहे का ? थोडा विचार केला तर आपल्यातला प्रत्येक जण जोर्डन आहे आणि जोर्डन आपल्या मधला एक आहे. पण कसं ?  मी फक्त जोर्डनच व्यक्तिमत्व इथे मांडतो आहे त्याचा सिनेमातलं रोल नाही. जोर्डनचा सिनेमातला रोल फार गंभीर होता, त्याचं व्यक्तिचरित्र फार वेगळं होतं, आपल्याला जोर्डनसारखे लोकं खऱ्या आयुष्यात आवडत नाही, आपण दूर पळतो त्यांच्या पासून. कारण जोर्डन हट्टी आहे, आपल्या मनाची करतो, जगाची त्याला काही चिंता नाही, पण मग आपण पण तर हट्टी आहोत ? फरक एवढाच आहे कि आपल्या मनात खूप काही आहे पण आपण आपल्या मनाचं न ऐकण्याचा आणि जनाच ऐकण्याचा हट्ट करतो. मग जर आपल्याला जे आवडतं ते आपण केलं तर  ” Can we become a Rockstar of our life ? विचार करा ?

Rockstar मधे एका गाण्यात रणबीर म्हणतो …. मैं उन परिंदों को ढूंड रहा हूँ, क्या आपने देखा हैं उन्हें. खूप मस्त वाटल्या त्या ओळी आणि मग त्या तालीवर असं काही सुचलं …

पता हैं बहुत साल पहले यहाँ एक स्टुडेंट हुआ करता था, Fresh, Energetic उमिन्दो से भरा हुआ, अपने मन का राजा ….. फिर उसे एक कंपनी में  Software Engineer की नौकरी मिल गयी, साफ़ सुथरे कपडे, कंपनी के सीधे रास्ते, सब कुछ सलीके से होने लगा. फिर जिस दिन उसे प्रोजेक्ट मिला, उस दिन उसके अंदर का वो इंसान  हमेशा हमेशा के लिए गायब हो गया .. कभी नहीं लौटा . मैं उस बंदे को ढूंड रहा हूँ, किसी ने देखा हैं उसे ? देखा हैं ??

Dedicated to all busy Software Guys 🙂

Rather than writing some piece of code of one of its Kind

Its better to do something which will give you peace of Mind : )

– श्रीकांत

कधी कधी वाटतं तुझ्याशी खूप खूप बोलावं,
मनातलं ह्रिदयातलं एकदा सगळं सांगून टाकावं…
पण क्षणातच हे मन त्या ह्रिदयाला सांगतं,
भिंतीवरचा त्या फोटो समोर आपण किती काळ उभं राहावं…

कधी कधी वाटतं तुझ्याशी खूप खूप बोलावं…

कित्येकदा हे मन सांगतं आपल्या आठवणींचे किस्से,
तुला आठवतं का गं… युनिवर्सिटीचा तो रोड आणि ते सायकल रिक्शे
त्या रिक्श्यात बसून तू कॉलेज ला यायची,
आणि माझ्या सायकलीला बघून उगाच नाक मूरडायची…
लेकचरला मात्र मला बघून हसायची,
आणि इथेच माझी खूप गोची व्हायची…

किती प्रयत्न केले नसेल मी तुझ्याशी बोलायचे,
कधी क्लास मध्ये तर कधी लायब्ररीत गाठायचे…
पण तू नेहमी आपली खून्नस द्यायची,
कधी माझ्या सायकलीवर तर कधी माझ्या कपड्यांवर हसायची…

मला आज पण आठवतो तो लायब्ररीतला दिवस,
आत अंधूक प्रकाश आणि बाहेर पावसाचं सावट…
तू ‘इंजिनियरींग ड्राव्हिंगच्या’ सेक्शन जवळ उभी होतीस,
तुझं लक्ष जरी पुस्तकात असलं तरी तुझी सावली माझ्यासोबत बोलत होती
मी म्हंटल “हेल्लो” आणि तू म्हंटल “बावरट”,
मग काय बसलो मी माझ्या मनाच्या काचा आवरत ….

कधी कधी वाटतं तुझ्याशी खूप खूप बोलावं,
मनातलं ह्रिदयातलं एकदा सगळं सांगून टाकावं…..

बाहेर पावसाचे टपोरे थेंब पडत होते,
माझ्या मनाच्या खिडकीत मात्र ते अश्रुंसारखे गळत होते…
मी स्वतःला सावरत कसा बसा बाहेर पडलो,
पण त्या बेधुंद पावसाकडे बघून दारावरच अडलो…

तो पाऊस पण मला आज थांबवू शकत नव्हता,
आपल्या जगण्यात काही अर्थ आहे का, हा प्रश्न मला पडत होता…
कोणता असा गुनाह मी केला होता आज,
फक्त “हेल्लो” तर म्हणालो आणि तीनी ठेवला बावरटाचा ताज
मी इतका पण बावरट नाही हे मला सुधा कळतं,
पण तिच्या मनाला का नेहमी सगळा विपरीतच उमजतं…

नकळतच मी पावसात आता ओला-चिंब झालो होतो,
विचार करता करता जणू कुठे तरी आलो होतो
तेवढ्यात कोणी तरी माझा धरला हात,
समोरचा पाऊल पडण्या आधीच मारली हाक

वळून बघतो तर ती पण पावसात ओली चिंब भिजली होती,
पाऊस जरी थांबला होता तिच्या अश्रूंची सर मात्र पडत होती…
मी खरच करतो गं तुझ्यावर फार प्रेम,
आज माझ्या जवळ काही नसलं तरी फक्त आहे तुझ्याबद्दलच प्रेम
माझ्या हाताला घट्ट पकडून सव्तःला सावरत
ती म्हणली हे आधी का नाही रे तू बोलला… “बावरट”

दाट भरून आलेले ते ढग आता विस्कळीत झाले होते,
माझ्या अंधारमय जीवनात काही सोनरी पावलं आले होते
तिच्या डोळ्यांचे ते अश्रू हातांनी पूसत,
माझे मन त्या प्रेमाने ओले चिंब झाले होते

किती वर्ष झाले गं आज त्या गोष्टीला,
किती पावसाळे मी पहिले प्रत्येक दिव्शीला…
तरी आज पण वाटतं या पावसात बेधडक निघावं,
दूर कुठे तरी जाऊन ओले चिंब व्हावं
माघून येवून तू तो हात पुन्हा धरावं,
आणि कायमचा मला तुझ्यासोबत घेऊन जावं…

कधी कधी वाटतं तुझ्याशी खूप खूप बोलावं,
मनातलं ह्रिदयातलं एकदा सगळं सांगून टाकावं…..

मित्रांनो I know उशीर तर झाला आहे पण still मी संपूर्ण कविता तुमच्या समोर सादर करत आहे. I hope तुम्हला आवडेल.
तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा 🙂

– श्रीकांत

कधी कधी वाटतं  तुझ्याशी खूप खूप बोलावं,
कधी कधी वाटतं  तुझ्याशी खूप खूप बोलावं,
मनातलं ह्रिदयातलं एकदा सगळं सांगून टाकावं…..
पण क्षणातच हे मन त्या ह्रिदयाला सांगतं
भिंतीवरचा त्या फोटो समोर आपण किती काळ उभं राहावं…..

कधी कधी वाटतं  तुझ्याशी खूप खूप बोलावं…

कित्येकदा हे मन सांगतं आपल्या आठवणींचे किस्से
कित्येकदा हे मन सांगतं आपल्या आठवणींचे किस्से
तुला आठवतं का गं… University चा तो रोड आणि ते सायकल रिक्शे
त्या रिक्श्यात बसून तू college ला यायची
आणि माझ्या सायकलीला बघून उगाच नाक मूरडायची…
lecture ला मात्र मला बघून हसायची
आणि इथेच माझी खूप गोची व्हायची………

किती प्रयत्न केले नसेल मी तुझ्याशी बोलायचे
किती प्रयत्न केले नसेल मी तुझ्याशी बोलायचे
कधी class  मध्ये तर कधी लायब्ररीत गाठायचे
पण तू नेहमी आपली खून्नस द्यायची
कधी माझ्या सायकलीवर तर कधी माझ्या कपड्यांवर हसायची…

मला आज पण आठवतो तो लायब्ररीतला दिवस
मला आज पण आठवतो तो लायब्ररीतला दिवस
आत अंधूक प्रकाश आणि बाहेर पावसाचं सावट
तू Engineering drawing च्या section जवळ उभी होतीस..
तुझं लक्ष जरी पुस्तकात असलं तरी तुझी सावली माझ्यासोबत बोलत होती
मी म्हंटल “Hello” आणि तू म्हंटल “बावरट”
मग काय बसलो मी माझ्या मनाच्या काचा आवरत ….

कधी कधी वाटतं  तुझ्याशी खूप खूप बोलावं,
मनातलं ह्रिदयातलं एकदा सगळं सांगून टाकावं…..
(क्रमश:)

ही स्टोरी इथेच संपली नहीं बर …. 🙂
काय झाला असेल …ती त्याला भेटली आणि सोडून गेली ….की ती त्याला कधीच भेटली नहीं ?
सगळी उत्तरं मिळतील ……थोडी वाट बघा ….stay tuned  .. 🙂

– श्री …

(22nd  Feb नंतर  आज लिहतो आहे …कुठे होतो मी इतके दिवस … याचं अजूनही उत्तर शोधतो  आहे …)

आजोबा…..

आज सलून मधे seat वर बसलो तर माझं लक्ष माझ्या माघे दुसऱ्या खुर्चीवर असणा-र्या गृहस्थांकडे गेलं . मी माझ्या सोमोरच्या आराशातन त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांनी त्यांच्या समोरच्या आराशातन माझ्याकडे बघितलं आणि smile दिली. Cutting saloon मधे एकमेकान समोर बसवलेले आरशे छान असतात 🙂 कारण त्यांनी तुम्हाला communicate करता येतं. यांना कुठे तरी बघितलं आहे असा विचार मला पडला ….पण कुठे  ?? आणि i guess हाच विचार त्यांना पण पडला असेल .पण त्यांनी smile दिली it means मला ओळखलं असेल ..मग आठवलं, अरे हो.. मागच्या महिन्यात मी आलो होतो तेंव्हा त्यांना  बघितलं होतं.काय योगायोग ना, आज पुन्हा  अशीच भेट झाली. पंधरा सदरा, धोतर आणि गांधी टोपी असं त्यांचं attire बघून मला माझ्या आजोबांची आठवण झाली … त्यांची पण अशीच  style होती. आज  १० वर्ष झाली त्यांना जाऊन पण त्या आठवणी अजूनही फ्रेश आहेत. माझे आजोबा म्हणजे कास्तकार (शेतकरी) पण दूरदुर्ष्टी वाले …त्यांनी जरी त्यांचा जन्म कास्तकारीत घातला पण आपली मुलं ही शिकली पाहिजे याचा पूर्ण प्रयत्न केला .लहानपणी  दिवाळीच्या सुट्ट्यात गावी ज्याचं म्हंटल कि मी खुश व्हायचो. विदर्भातल आमचं गाव, मला पुसटसं आठवत …. पण त्या वेळी बाबा पत्र टाकायचे, कि आम्ही या या तारखेला पोहोचतो आहे  … मग एक गडी, बैलगाडी घेऊन सकाळपासून मेन रोड वर आंब्याचा झाडाखाली आमची वाट बघत बसायचा …आमचं गाव हे highway च्या ८ km आत असल्यामूळे ही कसरत  करावी लागायची, पण मज्जा यायची … ST मधनं उतरल्यावर त्या बैलगाडीत बसून आजूबाजूची शेतं  बघत जायला मज्जा यायची 🙂 गावी पोहचल्यावर केंव्हा शेतात जातो असं व्हायचं ….झाडांना पांढरा कापूस कसा लागतो हे बघून आश्चर्य वाटायचं….पेरू संत्रे direct झाडांवरून तोडून खाण्यात मज्जा यायची …त्या तुरीच्या शेंगा चुलीवर मिठाच्या पाण्यात उकळून खायची माजाच वेगळी होती … 🙂

आमचे आजोबा आम्हा नातवांवर खूप प्रेम करायचे …ते सकाळी शेतात निघाले कि मी त्यांच्या माघे लागायचो …अरे नको खूप ऊन आहे , आपली वाडी खूप दूर आहे तुझे पाय दुखतील असं ते कारण द्यायचे . मग ‘नाही मी येणार’ असा हट्ट धरला कि “ठीक आहे पण पेहले डोक्याला शेला बांध नाही तर ऊन लागेल” असा त्यांचा dialogue असायचा 🙂 पुष्कळवेळा त्यांचा सोबत असा फेर फटका मारला आहे. …अश्या  पुष्कळ आठवणी आहेत …लहानपणी काही मस्ती केली आणि मार खायची वेळ आली कि बाबांपासून तेच वाचवायचे ….आणि कुठे जर मी धडपडलो तर त्या  जखमेवर tincture iodine पण तेच लावायचे  …. ‘यांनी खूप आग होते’ असा म्हंटल कि म्हण्याचे ..अरे पण लवकर ठीक होईल त्यानीच …फार favorite होतं ते त्यांचं dettol पेक्षा पण  🙂 हनुमानाचे ते एक no. भक्त होते … रोज संध्याकाळी गावातल्या  पारावरच्या मंदिरात दिवा लावायला नेमानी जायचे, कीर्तन, काकड आरती यात नेहमी हजार असायचे.

मागच्या आजोबांची cutting संपली आणि ते आपली गांधी टोपी घालून निघाले. हळू हळू काठी घेऊन तोल सांभाळत जातांना त्यांना पाहून वाईट वाटलं, त्यांच्या म्हातारपणाची जाणीव झाली पण त्यांच्या  चेहऱ्यावर smile होती … मी आता चांगला दिसत आहे असे ते expression होते..  ते बघून खूप बरं वाटलं, किती पण काष्ठ झाले तरी या जगाला चेहऱ्यावर समाधान ठेवून आणि smile देऊन तोंड दिलं पाहिजे याची पुन्हा जाणीव  झाली. पुन्हा मला flashback मधे आजोबां सोबतचे शेवटचे दिवस आठवले, ज्या हनुमानाच्या मंदिरात त्यांनी आयुष्भर पूजा केली तिथेच ते पडले 😦 त्या संध्याकाळी गावात वीज नव्हती आणि बहुदा त्यांना अंधारात बरोबर दिसलं नसेल, ३ दिवस ICU मधे राहून चांगले recover होत असताना अचानक एके दिवशी ते गेले. हॉस्पिटल मधे असताना एके संध्याकाळी मी त्यांच्या जवळ बसलो होतो  तेव्न्हा मला म्हणाले “मला मंदिरात जायचं आहे दिवा लावायचा आहे” … मी रागात बोललो ‘ज्या देवानी आज हे केलं तिथे आत्ता दिवा लाऊन काय फायदा’ 😦 तर तीच smile चेहऱ्यावर देत म्हणाले “असं नाही  म्हणायचं ….कळेल तुला एका दिवशी”…आणि खरच आपण किती पोरकट आणि लहान होतो त्या काळी हे आज कळत. स्वतःच्या बालिशपणावर चीढ येते ..पण काळाप्रमाणे माणूस शिकतो ..आज त्यांच्या त्या शब्दांचा अर्थ कळतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवावरचा आणि स्वतःवरचा विश्वास माणसाने कधी सोडू नये.या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत . जुन्या लोकांची हीच गोष्ट मला फार आवडते ते कडक होते पण मनापासून प्रेम करायचे, त्यांचं जग जरी सीमित असलं, लहान असलं पण तरी त्यांच्यात दूर दृष्टी होती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे किती पण कष्ट झाले तरी या जगाला smile देऊन हसून तोंड द्यायचं ही त्यांची शिकवण होती 🙂 I still miss him, there were many beautiful things to learn from him… today he is not there which makes me sad but when I remember his smile that still makes me smile…. cutting संपली, मी smile करत नाव्ह्याला पैसे दिले आणि निघालो ….त्याला पण २ मिंट कळलं नाही कि मला काय झालं !!!  त्यावेळी कुठेतरी मनात मला वाटत होतं कि आजोबा आत्ता पण मला बघून smile करत आहे आणि मी त्यांना reply तर केलाच पाहिजे 🙂

-Shri…