Harvard University…
लवकरच add करील माझ्या Harvard University च्या ट्रिप बद्दल …..
थोड़ी वाट बघा…
25 Oct 2009
American Football
सुरुवात कुठ्न करायची …..जुन्या ट्रिप की नविन ? Lets start with the latest कारण त्या memories अजूनही फ्रेश आहेत
तर सर्वप्रथम American Football…. जस आपण क्रिकेट साठी वेडे आहोत तसच अमेरिकन पब्लिक पण या sports साठी वेडी आहे. They will die for this game. हा गेम रग्बी चा enhanced version आहे. तो mostly खेळतात हातानी पण तरी त्याला Football म्हणतात
मी बोस्टन ला असताना मला एक pre season गेम बघण्याची संधी मिळाली. ऑफिस मधन आम्ही आठ जण New England Patriots च्या Gillette स्टेडियम कड़े निघालो. New England Patriots ही बोस्टन ची होम टीम. मी आणि बिल जेव्न्हा कार नि निघालो तेव्न्हा बिल नी एक नविन tshirt घातली, त्यावर लिहला होत “brady”. मी बिल ला विचारल हा कोण तर तो म्हणला हा आमचा स्टार player – one of the best quarterback. मग बिल नी स्टेडियम पोहचे पर्यंत मला गेम चे रूल्स समजावून सांगितले. सुरुवातीला मला हा गेम boring वाटला पण जसा जसा तो मला कळला तसा तसा मला तो आणखिन मजेदार वाटू लागला.
स्टेडियम बघूनच मी चित झालो. किती huge होत ते !!! त्याची कैपसिटी होती almost 65,000. सगळीकड़े टीम चा वेगवेगळ्या players च्या tshirts घालून लोक फिरत होते. सही माहोल होता

Gillette_stadium
गेम सुरु व्हायला अजून वेळ होता. तो पर्यंत मी अणि बिल नी अर्ध्या स्टेडियम चा चक्कर मारला. काही amazing photo काढले.

Amazing view of Stadium

View from our seats

cheer leaders
मग बिल नी त्याचे आवडते chicken nuggets तर मी French fries घेतलेत. आणि दोन लार्ज coke घेउन आम्ही बसलो. थोड्याच वेळात जेफ़ आणि मेलनी पण आम्हाला join झालेत.हा गेम ‘New England Patriots’ vs ‘Cincinatti Bengal’ असा होता. बंगाल हा शब्द ऐकून मला आश्चर्य वाटलं. आणि माझा अंदाज़ खरा ठरला. गेम संपल्यावर जेंव्हा मी google केलं तेंव्हा कळल की या टीम चा स्थापने वेळी cincinatti या शहरात जो Zoo होता त्यात एकच white bengal tiger होता आणि त्यावर सगळी पब्लिक फ़िदा होती
आणि म्हणून त्यानी टीम चा नावात बंगाल शब्द add केला. टीम च्या लोगो मधे पण बंगाल tiger चा समावेश करण्यात आला. हा तर मी कुठे होतो …. ? तर एका side ला दोन्ही teams च warmup session चालू होता तर दुस-या साइड ला cheers leaders चा show चालू होता. थोड्याच वेळात announcement झाली, national anthem झालं आणि गेम सुरु झाला.Half time पर्यंत दोन्ही टीम जबरदस्त defence नी खेळत होती. स्कोर सारखा होता. मला पण आता गेम पूर्ण समजला होता. पून्हा cheer leaders चा शो सुरु झाला. दोन्ही साइड च्या cheer leaders आपापल्या टीम्स ला cheer karat होत्या. गेम पून्हा सुरु झाला. तेवढ्यात New England च्या quarter back नी एक जबरदस्त throw केला आणि , runner नी तो पकडला पण त्याच क्षणी opposition चा एका defender नी त्याला जबरदस्त hit केलं . पाहता पाहता सगळे players त्या एका player च्या वरती !!! . सगळे ball शोधतात आहे . या क्षणी मला त्या runner ची फार किव आली तो सगळ्यात खाली दबला होता . तो जीवंत असेल की नाही या बद्ल मला पण gurantee नव्हती
तेवढ्यात त्या runner नी to ball दुस-याला pass केला , आणि तो पळत सुटला , पूर्ण स्टेडियम मधे फ़क्त एकच सुर ऐकू येत होता run run …run …common you can do it… run buddy run… एकीकडे commentator ओरडत होता 50 yards to go,30 yards to go, 10 yards to go…. opposition चे players त्याला थांबवण्याचा अतोनात प्रयत्न करत होते पण कोणालाही यश मिळत नव्हतं …आणि शेवटी तो लाइन पलिकडे पोहचला आणि commentator ओरडला its a touchdown….its a touchdown…. touchdown झाल्याच त्या runner नी त्याचा breakdance चालू केला , त्या dance मधे अजून जास्त teammates join झालेत … oppostion ला चिडवत ते नाचत होते … खरच खूप मज्जा आली ..तो क्षण मी आज पण विसरु शकत नाही. ….गेम पून्हा सुरु झाला opposition नी पण पूर्ण जोर लाउन equalizer केला आणि last moment ला game संपायला एक min असताना सिनसिनाटीच्या team नी एक फेइल्ड goal केला व एक पॉइंट ची lead मिळून गेम जिंकला :’( . सगळ stadium अचानक शांत झालं, आवाज़ होता तर तो फ़क्त opposite team चा . फ़क्त एक point नी आपण game हरलो याचं सगळ्याना दुःख होत. मला पण वाइट वाटलं, पण एका गोष्टीचा आन्नद होता . हा गेम जरी New England Patriots हरला असेल तरी त्यानी माझं मन जिंकलं होतं
24 Oct 2009
भटकंती .. एक नवा उपक्रम
मला भटकायला फार आवडतं . आणि त्याच बरोबर photography पण आवडते. कधी कधी अस वाटतं सगळ सोडून सवतः चा camera घेउन दूर निघून जाव. जंगलात भटकाव, नविन ठिकाण शोधून काढावित. नवीन शहर बघावित, नवीन फ़ूड try करावं. Tokiyo ते California सगळ जग फिरावं.तस माझ्या हिटलिस्ट वर बरच काही आहे, नशिबात असेल तर ते पण होइल.
आपण इतक फिरतो, नवीन फोटो काढतो, नवीन गोष्टी try करतो, तर त्याची कुठे नोंद असायला हवी अस मला फार दिवसांपासनं वाटत होतं म्हणुन ‘भटकंती’ हा नवीन Page मी add केला आहे. या page through मी माझी प्रवासवर्णनन , काही अप्रतिम photos, गमंती – जमंती याची नोंद ठेवू शकेल. चला…. मग नेक काम में देरी क्यूँ ?

Wow man the way u described the match ……it was like everything was happening in front of my eyes……awesome writing …..keep it up bro……..
Keep it up !
Good Luck !