आज सलून मधे seat वर बसलो तर माझं लक्ष माझ्या माघे दुसऱ्या खुर्चीवर असणा-र्या गृहस्थांकडे गेलं . मी माझ्या सोमोरच्या आराशातन त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांनी त्यांच्या समोरच्या आराशातन माझ्याकडे बघितलं आणि smile दिली. Cutting saloon मधे एकमेकान समोर बसवलेले आरशे छान असतात
कारण त्यांनी तुम्हाला communicate करता येतं. यांना कुठे तरी बघितलं आहे असा विचार मला पडला ….पण कुठे ?? आणि i guess हाच विचार त्यांना पण पडला असेल .पण त्यांनी smile दिली it means मला ओळखलं असेल ..मग आठवलं, अरे हो.. मागच्या महिन्यात मी आलो होतो तेंव्हा त्यांना बघितलं होतं.काय योगायोग ना, आज पुन्हा अशीच भेट झाली. पंधरा सदरा, धोतर आणि गांधी टोपी असं त्यांचं attire बघून मला माझ्या आजोबांची आठवण झाली … त्यांची पण अशीच style होती. आज १० वर्ष झाली त्यांना जाऊन पण त्या आठवणी अजूनही फ्रेश आहेत. माझे आजोबा म्हणजे कास्तकार (शेतकरी) पण दूरदुर्ष्टी वाले …त्यांनी जरी त्यांचा जन्म कास्तकारीत घातला पण आपली मुलं ही शिकली पाहिजे याचा पूर्ण प्रयत्न केला .लहानपणी दिवाळीच्या सुट्ट्यात गावी ज्याचं म्हंटल कि मी खुश व्हायचो. विदर्भातल आमचं गाव, मला पुसटसं आठवत …. पण त्या वेळी बाबा पत्र टाकायचे, कि आम्ही या या तारखेला पोहोचतो आहे … मग एक गडी, बैलगाडी घेऊन सकाळपासून मेन रोड वर आंब्याचा झाडाखाली आमची वाट बघत बसायचा …आमचं गाव हे highway च्या ८ km आत असल्यामूळे ही कसरत करावी लागायची, पण मज्जा यायची … ST मधनं उतरल्यावर त्या बैलगाडीत बसून आजूबाजूची शेतं बघत जायला मज्जा यायची
गावी पोहचल्यावर केंव्हा शेतात जातो असं व्हायचं ….झाडांना पांढरा कापूस कसा लागतो हे बघून आश्चर्य वाटायचं….पेरू संत्रे direct झाडांवरून तोडून खाण्यात मज्जा यायची …त्या तुरीच्या शेंगा चुलीवर मिठाच्या पाण्यात उकळून खायची माजाच वेगळी होती …
आमचे आजोबा आम्हा नातवांवर खूप प्रेम करायचे …ते सकाळी शेतात निघाले कि मी त्यांच्या माघे लागायचो …अरे नको खूप ऊन आहे , आपली वाडी खूप दूर आहे तुझे पाय दुखतील असं ते कारण द्यायचे . मग ‘नाही मी येणार’ असा हट्ट धरला कि “ठीक आहे पण पेहले डोक्याला शेला बांध नाही तर ऊन लागेल” असा त्यांचा dialogue असायचा
पुष्कळवेळा त्यांचा सोबत असा फेर फटका मारला आहे. …अश्या पुष्कळ आठवणी आहेत …लहानपणी काही मस्ती केली आणि मार खायची वेळ आली कि बाबांपासून तेच वाचवायचे ….आणि कुठे जर मी धडपडलो तर त्या जखमेवर tincture iodine पण तेच लावायचे …. ‘यांनी खूप आग होते’ असा म्हंटल कि म्हण्याचे ..अरे पण लवकर ठीक होईल त्यानीच …फार favorite होतं ते त्यांचं dettol पेक्षा पण
हनुमानाचे ते एक no. भक्त होते … रोज संध्याकाळी गावातल्या पारावरच्या मंदिरात दिवा लावायला नेमानी जायचे, कीर्तन, काकड आरती यात नेहमी हजार असायचे.
मागच्या आजोबांची cutting संपली आणि ते आपली गांधी टोपी घालून निघाले. हळू हळू काठी घेऊन तोल सांभाळत जातांना त्यांना पाहून वाईट वाटलं, त्यांच्या म्हातारपणाची जाणीव झाली पण त्यांच्या चेहऱ्यावर smile होती … मी आता चांगला दिसत आहे असे ते expression होते.. ते बघून खूप बरं वाटलं, किती पण काष्ठ झाले तरी या जगाला चेहऱ्यावर समाधान ठेवून आणि smile देऊन तोंड दिलं पाहिजे याची पुन्हा जाणीव झाली. पुन्हा मला flashback मधे आजोबां सोबतचे शेवटचे दिवस आठवले, ज्या हनुमानाच्या मंदिरात त्यांनी आयुष्भर पूजा केली तिथेच ते पडले
त्या संध्याकाळी गावात वीज नव्हती आणि बहुदा त्यांना अंधारात बरोबर दिसलं नसेल, ३ दिवस ICU मधे राहून चांगले recover होत असताना अचानक एके दिवशी ते गेले. हॉस्पिटल मधे असताना एके संध्याकाळी मी त्यांच्या जवळ बसलो होतो तेव्न्हा मला म्हणाले “मला मंदिरात जायचं आहे दिवा लावायचा आहे” … मी रागात बोललो ‘ज्या देवानी आज हे केलं तिथे आत्ता दिवा लाऊन काय फायदा’
तर तीच smile चेहऱ्यावर देत म्हणाले “असं नाही म्हणायचं ….कळेल तुला एका दिवशी”…आणि खरच आपण किती पोरकट आणि लहान होतो त्या काळी हे आज कळत. स्वतःच्या बालिशपणावर चीढ येते ..पण काळाप्रमाणे माणूस शिकतो ..आज त्यांच्या त्या शब्दांचा अर्थ कळतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवावरचा आणि स्वतःवरचा विश्वास माणसाने कधी सोडू नये.या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत . जुन्या लोकांची हीच गोष्ट मला फार आवडते ते कडक होते पण मनापासून प्रेम करायचे, त्यांचं जग जरी सीमित असलं, लहान असलं पण तरी त्यांच्यात दूर दृष्टी होती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे किती पण कष्ट झाले तरी या जगाला smile देऊन हसून तोंड द्यायचं ही त्यांची शिकवण होती
I still miss him, there were many beautiful things to learn from him… today he is not there which makes me sad but when I remember his smile that still makes me smile…. cutting संपली, मी smile करत नाव्ह्याला पैसे दिले आणि निघालो ….त्याला पण २ मिंट कळलं नाही कि मला काय झालं !!! त्यावेळी कुठेतरी मनात मला वाटत होतं कि आजोबा आत्ता पण मला बघून smile करत आहे आणि मी त्यांना reply तर केलाच पाहिजे
-Shri…
Excellent !! Senti aahe yar ..I really missed my grand father (aai che baba) after reading this..
I agree with what you have mentioned .. I still feels presence of my Grand father .. memories are still fresh .. though I have grown up (allow me
) still I miss him like a small child and I feels these kind of memories, relations, friends, people (which deeply touches our heart) .. should be our Gain in life.
my thought – birth and death are two points which is connected by a line called as life, and this line is “Anadi” and “Ananat”. At the end what you will be asked for how much love you have given not how much you have taken.
Older generation people has always given more and more to us , now its our time. Now in days love and humanity is diminishing generation by generation.
श्रीकांत, खूपच छान लिहिले आहेस. बरेच वेळा अशी वात बघायला लागणाऱ्या ठिकाणी खूप कंटाळा येतो. वर्तमानपत्र वाचणे, आपला नंबर कधी येतोय याची वात बघत रेडिओचा मारा सहन करावा लागतो. तू एक वेगळा दृष्टीकोन दाखवला आहेस अश्या परिस्थितीत एक वेगळा विचार करण्याचा… खूपच छान… आणि दुसरे म्हणजे आता आपण सगळे एवढे मोठ्ठे झालो आहेत की आपल्या घरातील मोठे – आजी-आजोबा यांचे विचार-आचार समजून घेऊ शकतो. मी पण माझ्या आजोबाचा दिनक्रम आठवतोय. ८५ वर्षाचे होईपर्यंत ते रोज व्यायाम करत होते. आणि तूला सांगायचे म्हणजे माझ्या आजोबांनी मला मासे खायला लाग असे खूप सांगितले होते
असेच छान छान लिहित जा. धन्यवाद मित्रा…..
Shrikant…..
khuuuuuuuuuuup ch sahi lihila aahes…
saloon madhle aajoba n tujhe aajoba hyana relate kartana sahi balance sadhla aahes…
an baaki, lahanpanachya aathvanit gheun gelas…suttya,mamaacha/kakaacha gaav…
senti lihilayes ekdam….
lihit raha..vachtoy aamhi
Pankaj, Vinod, abhay ani Gayatri tumche manapasun thanks
kharach faar jaberdast comments takley aheet.
Pankaj – tujhi “still I miss him like a small child” wali line faar senti hotti
Vinod- “birth and death are two points which is connected by a line called as life” ekdum mast line. thanks again for sharing such beautiful peice.
abhay- “माझ्या आजोबांनी मला मासे खायला लाग असे खूप सांगितले” ekdum hilarious line
Gayatri – Tujhi ter kamal ahee…I can’t imagine ki seoul airport ver tu mail chk karun aajchi post check keli ani itkey surkeh comments deleat… kharach tai tu great ahees…
-Shri..
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
I still miss the vacations we spend with our grandparents. They were very natural. No show business.
Turichya shengana panyat ukaltat tyana kai mhantat? “Popat? ” or “Ghugarya?”
Keep up writing !
Enjoy !
Abhijit