शनिवारी संध्याकाळी मी आणि माझा मित्र आम्ही दोघं काही कामं आटपायाला निघालो. त्याला काही शर्ट घ्यायचे होते म्हणून दुकानात शिरलो तोच मुंबईच्या जीजाजींचा फोन आला. hello म्हणायच्या आधीच प्रश्न होता कुठे आहेस ? म्हंटल इथेच घरा जवळ कर्वे रोड ला …. तर ते म्हणाले घरी पोहचा… बाहेर फिरू नका कोरेगाव मधे जर्मन बकेरीत ब्लास्ट झाला…!!!! थोडा वेळ काही कळलंच नाही … पुन्हा त्या मुंबई ब्लास्ट चा आठवणी जागृत झाल्या
मुंबईतला तो क्षण पुन्हा आठवला आणि अंगावर काटा आला. पुन्हा त्या क्षणाची पुनरावृत्ती होते कि काय असा प्रश्न पडला ? घरी ( नागपूरला ) फोन करून आईला सांगितलं कि सगळ ठीक आहे…. घरी पोहोचतो लवकर. काही मित्रांना call केला मग वस्तुस्थिती कळली
वाईट वाटलं , चीड आली आपण किती दिवस असं सहन करणार आणि किती दिवस असं चालणार हा प्रश्न पडला ?
पेपर मधला आकडा सांगतो कि ९ ठार ६० जखमी
आणि त्यातले बहुतांश लोक म्हणजे young crowd
आणि शेवटी यात मरणारा म्हणजे common माणूस हो. बाकीच्यांना काय फरक पडतो ? फुटणारा बम हा व्यक्तीचा धर्म, जात किवा nationality विचारून थोडी फुटतो ? आणि तसं आजकाल political लोकांनकडनं काही अपेक्षा नाहीत . अर्धे जण हा picture release नाही झाला पाहिजे यात busy आहेत तर बाकी तो release झाला पाहिजे म्हणून पोलीस बंदोबस्त करतात आहे. अरे काय चालू आहे हे … लहान पोरांना सुद्धा कळतं कुठे वाद घालायचा ? जे झालं ते वाईट झालं पुढे काय होईल याची gurantee नाही
प्रश्न पडतो तर फक्त असं किती दिवस चालणार ?
कधी तरी चार ओळी हिंदीत लिहल्या होत्या ..त्याच पुन्हा सादर करतो आहे ….
बेसब्र क्यूँ हैं आज आदमी … आदमी को बेआबरू करवाने …
क्यूँ उठ खड़ा है वो आज …इस कत्लेआम को अजमाने …
या खुदा इनको कभी जन्नत नसीब न करना,
बहुत कम ही है इनके जैसे आदमी, आदमी को मारने वाले …..
- Shri…
Ho .. agree with you..
Khup wait watale aaiklya nantar ..Mi Mumbai madhe hoto .. mulund local blast che wadi .. (infact magachya local madhe travel karat hoto )
seen all these things closely.
But now a day I feel that .. no body can do anything for this .. its very easy to do these kind of blast .. no body can catch them
In fact some times I feel . these kind of blast might have been done by some one internal group of people.
कोणालाच माहिती नाही किती दिवस असे चालेल, पण मुंबईच्या लोकांची तर काहीही सहन करायची मनाची तयारी नक्की असेल. पुण्यात पहिल्यांदा झाला म्हणून काही लोकांना धक्का बसला. स्वाभाविक आहे असा धक्का बसणे. किती दिवस चालणार पेक्षा आपण किती दिवस चालून देणार ह्याचा पण विचार करायला पाहिजे. जर प्रत्येक नागरिकाने थोडी आणखीन काळजी घेतली तर एवढ्या प्रमाणात बॉम्बस्फोट नाही होणार. ज्याने बॉम्ब ठेवला तो नक्कीच कुठेतरी राहिला असेल. हेडली कोरेगाव पार्क मध्ये आला होता हे माहिती होते तरीसुद्धा असे झले. कसाब जिवंत पकडला आहे आणि एक वर्ष झाले तरी त्याला शिक्षा नाही. उलट त्यावर सरकार खूप पैसे खर्च करत आहेत, त्याला संरक्षण देत आहेत. शस्त्रे, RDX देशात येऊ नये हे बघितले पहिजे, दोषी व्यक्तींना जबर शिक्षा झाली पाहिजे, तरच असे होणे कमी होईल.